मेट्रो 3 चे 'गो ग्रीन'

 Mumbai
मेट्रो 3 चे 'गो ग्रीन'

‌मुंबई - मेट्रो 3 प्रकल्पात 5 हजार 012 झाडांची कत्तल होणार असून आरेचे जंगल नाहीसे होणार आहे. यावर एमएमआरसीने उपाय म्हणून मेट्रो स्थानक आणि आसपासच्या परिसरात 25 हजार रोपटी लावण्याचा निर्णय घेतलाय. मेट्रोची 27 स्थानके तसेच शाळा, गृहनिर्माण सोसायट्या आणि मोकळ्या जागेत ही रोपटी लावली जाणार आहेत. या रोपट्यांचे लवकरच वाटप करण्यात येणार असल्याचेही एमएमआरसीकडून सांगण्यात आले आहे. हा प्रकल्प महत्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पात पर्यावरणाला धक्का बसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, असे एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले आहे.

मेट्रो 3 मुळे आरेच्या झाडांची कत्तल होणार आहे. या विरोधात पर्यावरणप्रेमी आणि आरे वासीयांनी आवाज उठवला आहे. त्यामुळे हा प्रकल्प अडचणीत आला. त्यामुळे मेट्रोला असलेला विरोध कमी करण्यासाठी आणि या प्रकरणाची तीव्रता कमी करण्यासाठी एमएमआरसीने नामी शक्कल शोधून काढल्याचं बोललं जात आहे.

Loading Comments