Advertisement

'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, IMDचा हाय अलर्ट

पावसाच्या स्थितीत घराबाहेर पडण्यापूर्वी काळजी घेण्याचा सल्लाही हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, IMDचा हाय अलर्ट
SHARES

मान्सूनचं (Monsoon) आगमन होण्यापूर्वीच राज्याला पूर्व मोसमी पावसानं (Pre monsoon rain) झोडपून काढलं आहे. मागील पाच दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला आहे. आजही राज्यातील बऱ्यांच जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाचे ढग घोंघावत आहेत.

पुढील काही दिवस पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील (rain alert in pune) अशी माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. त्याचबरोबर पावसाच्या स्थितीत घराबाहेर पडण्यापूर्वी काळजी घेण्याचा सल्लाही हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या मुंबई वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस पुणे, नाशिक, धुळे, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान याठिकाणी ३० ते ४० किमी प्रतितास इतक्या वेगानं वारा वाहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाच्या प्रतिकुल स्थितीत घराबाहेर पडू नये. त्याचबरोबर आकाशात विजा चमकत असताना मोठ्या झाडाखाली उभं न राहाण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

त्याचबरोबर बीड, लातूर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठीही पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत. या जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार पुढील दोन दिवसांत (3 जून) केरळात मान्सून दाखल होणार आहे. तर मुंबईत (Mumbai Rains) ११ ते १४ जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आयएमडीच्या आकडेवारीवरून हे देखील स्पष्ट झालं आहे की, १ मार्च ते ३१ मे दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस पडला आहे. शिवाय, हंगामात २०.२ मिमीच्या सरासरीच्या तुलनेत शहरात ३०४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.हेही वाचा

तौंते चक्रीवादळग्रस्तांना २५२ कोटी रुपयांची मदत जाहीर

पदपथांवर झाडं लावू नका, महापौरांचं मुंबईकरांना आवाहन

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा