Advertisement

सीएसएमटीमध्ये फुलणार औषधी बाग

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हर्बल गार्डन ही संकल्पना राबवण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने घेतला आहे.

सीएसएमटीमध्ये फुलणार औषधी बाग
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हर्बल गार्डन ही संकल्पना राबवण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने घेतला आहे. या ठिकाणी १२०हून अधिक आयुर्वेदिक झाडे लावण्यात येणार असून, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची देखरेख करण्यात येईल. याचा लाभ मुंबईतील लाखो प्रवाशांना घेता येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८च्या प्रवेशद्वाराजवळ हेरिटेज गल्लीच्या परिसरात ही बाग तयार करण्यात येत आहे. हर्बल वनस्पती आणि झुडपांच्या सुमारे १२० विविध प्रजातींचा संग्रह यात असेल. यात ब्राह्मी, अश्वगंधसह इव्हिनिंग प्राइम रोझ, पुदीना, अडुळसा, जिरे, अपमार्ग, वेलची, मिरे, शतावरी, तुळस या आणि अन्य औषधी वनस्पतींचा समावेश आहे.

अश्वगंध हा कुष्ठरोग, चिंताग्रस्त विकार, रक्तवाहिन्यासंबंधी रोग, संधिवात आणि सर्व प्रकारच्या अशक्तपणासाठी शक्तिवर्धक म्हणून आणि जोम व चैतन्य निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. ब्राह्मी ही अपस्मार, मानसिक आजार आणि स्मरणशक्ती नष्ट होणे यांसारख्या विकारांच्या उपचारांमध्ये वापरली जाते. इव्हिनिंग प्राइम रोझ ही वनस्पती त्यातील तेल कॉस्मेटिक हेतूंसाठी आणि मासिक पाळीच्या संबंधित उपचारांसाठी आहार पूरक म्हणून व्यापकपणे वापरले जाते. मेन्थॉल पुदीना हे टूथपेस्ट, माऊथ वॉश आणि कॉस्मेटिक्स तयार करण्यामध्ये देखील वापरली जाते.

मेन्थॉलचा उपयोग पेन बाम, एनाल्जेसिक क्रीम आणि खोकल्याचे औषध इत्यादी औषधांमध्ये देखील केला जातो. त्याचबरोबर अडुळसा, जिरे, अपमार्ग, वेलची, मिरे, शतावरी, तुळसी इत्यादी औषधींचा समावेश आहे. खोकला आणि सर्दीवर प्रभावी उपाय म्हणून यांचा वापर होतो. अंजीर, हळद, इन्सुलिन, गुडमार, तेज पत्ता इत्यादी मधुमेहासाठी आणि सर्प गंधा, गिलोई, लवंग इत्यादी औषधी वनस्पती अनेक रोग आणि आजारांवर प्रभावी उपाय आहेत.

हर्बल किंवा औषधी वनस्पती सामान्यत: रक्तदाब कमी होणे, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग रोखणे किंवा कर्करोगाचा धोका कमी करणे अशा अनेक कारणांसाठी उपयुक्त आहेत. जैवविविधता सुधारण्याव्यतिरिक्त ही झाडे ऑक्सिजनची पातळी वाढविण्यात आणि वायू आणि ध्वनिप्रदूषण कमी करण्यास देखील मदत करतात.



हेही वाचा -

कोरोनामुळं शिक्षकांना घरून काम करण्याची सूचना

मुंबईची लॉकडाऊच्या दिशेनं वाटचाल; १९२२ जणांना कोरोनाची लागण


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा