Advertisement

कोरोनामुळं शिक्षकांना घरून काम करण्याची सूचना


कोरोनामुळं शिक्षकांना घरून काम करण्याची सूचना
SHARES

मुंबईत (mumbai) गेल्या महिन्यापासून सतत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबई महापालिकेच्या शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बुधवारपासून घरून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी लागल्यानंतर ५० टक्के शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा शिक्षकांना घरातूनच काम करण्याची सूचना देण्यात आली आहे.

मुंबई महापालिका (Bmc) क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षकांनी पुढील आदेश येईपर्यंत घरी राहून ऑनलाइन तासिका घ्याव्यात असे आदेश पालिकेने दिले आहेत. घरातून काम करताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या दैनंदिन कामाची गूगल शीट किंवा वर्कशीटमध्ये नोंद करणे बंधनकारक असणार आहे. शिवाय, शालेय पोषण आहार योजनेंतर्गत धान्याचे वितरण करण्यासाठी शाळेत शिक्षकांची उपस्थिती आवश्यक असल्यास त्या संदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार मुख्याध्यापक किंवा शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपवण्यात आले आहेत.

एकाच दिवशी सर्व शिक्षकांना शाळेत बोलावू नये, असे महापालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात केले आहे. रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे घरातूनच काम करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली होती.हेही वाचा -

चिंता वाढली, राज्यात १७ हजार ८६४ कोरोनाचे नवे रुग्ण

दर आठवड्याला कोरोना लसीचे २० लाख डोस द्या, राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा