Advertisement

पुढील २ दिवस मुंबईतील उकाडा कायम राहणार- IMD

कुलाबा वेधशाळेत बुधवारी किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. तर कमाल तापमान बुधवारी ३५ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.

पुढील २ दिवस मुंबईतील उकाडा कायम राहणार- IMD
SHARES

सोमवारी मुंबईच्या तापमानात घट झाली होती. १८.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. तर बुधवारी तापमानात वाढ झाल्याचं आढळून आलं. ९ डिसेंबर रोजी भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) सांताक्रूझ वेधशाळेमध्ये किमान २०.८ अंश सेल्सियस आणि कमाल ३६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, आयएमडीनं सांगितलं की, मंगळवारी सहा वर्षातील डिसेंबरमधील सर्वात उष्ण दिवस होता आणि तापमान सामान्यपेक्षा चार अंशांपेक्षा जास्त होते. गेल्या आठवड्यापासून शहरातील कमाल तापमानात वाढ होत आहे. सध्या किमान आणि कमाल तापमान १६ अंश सेल्सियसपर्यंत आहे.

कुलाबा वेधशाळेत बुधवारी किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. तर कमाल तापमान बुधवारी ३५ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या प्रदेशातील किमान आणि कमाल तापमान सामान्यपेक्षा १.७ अंश आणि २.७ डिग्रीपेक्षा जास्त आहे.

बुधवारी महाराष्ट्राच्या इतर भागातही किमान तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस मुंबईतील किमान तापमान सामान्यपेक्षा अधिक असेल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या अंदाजानुसार, पाच दिवसांच्या कालावधीत किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे २१ आणि ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. आयएमडीनं सांगितलं की, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात येत्या काही दिवसांत जास्तीत जास्त तापमानात घट होऊ शकेल.

दरम्यान, आयएमडीनं इशारा दिला आहे की, ११ आणि १२ डिसेंबर रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा