Advertisement

मुंबईत मुसळधार पाऊस, 'या' भागांमध्ये साचले पाणी

मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस, 'या' भागांमध्ये साचले पाणी
SHARES

मुंबईच्या कुलाबा वेधशाळेत गुरुवारी 106.8 मिमी पावसाची नोंद झाली. तर सांताक्रूझ वेधशाळेत 43.6 मिमी पावसाची नोंद झाली. मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. तसंच ट्रिफिक जामचा देखील सामना मुंबईकरांना करावा लागत आहे.

दरम्यान, नागरिकांनी ट्विटरवर पाणी साचल्याच्या तक्रारी शेअर केल्या.

बेस्ट बसचे मार्ग देखील बदलण्यात आले आहेत. 


गुरुवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे पाणी साचून वाहतूक कोंडीही झाली. मुंबईतील मरीन ड्राईव्हला आज झालेल्या पावसात भरतीचा मोठा फटका बसला.

भारतीय हवामान केंद्राने (IMD) मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट (मुसळधार ते अतिवृष्टीचा) जारी केला आहे. पुढील दोन दिवस मुंबईतही मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील सध्याच्या पावसाचे श्रेय पश्चिम किनार्‍यालगतच्या किनार्‍यावरील कुंड आणि अरबी समुद्रावरील चक्रीवादळामुळे आहे.हेही वाचा

सावधान! मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्टचा इशारा, BMC अलर्टवर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा