Advertisement

Mumbai rain update : शुक्रवारसाठी IMD कडून यलो अलर्ट

शुक्रवारी पावसामुळे मुंबईतील काही शाळांनी स्वत:हून सुट्टी जाहीर केली. तर ठाण्याच्या शाळांना तर जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली.

Mumbai rain update : शुक्रवारसाठी IMD कडून यलो अलर्ट
SHARES

शुक्रवारी काही ठिकाणी हलक्या पावस पडण्याच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

मुंबई उपनगरांच्या तुलनेत गुरुवारी शहरात पावसाचा जोर अधिक होता. बुधवारी सकाळी 8.30 ते गुरुवारी सकाळी 8.30 या 24 तासांत कुलाबा केंद्रात सरासरी 223.2 मिमी पावसाची नोंद झाली. याच काळात मुंबई उपनगरांत 145.1 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. 

मुसळधार पावसामुळे विविध शहरांमध्ये पाणी साचलं असून पूरसदृश परिस्थिती आणि भूस्खलन होत आहे. त्यामुळे, राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण दलांना तत्पर राहण्यास सांगण्यात आलं आहे. 13 टीम यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. 

मुंबईत गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले असून बहुतांश रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे आणि पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे सेवांना विलंब झाला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुरुवारी माहीममधील कॉजवेपर्यंतच्या दक्षिणेकडील भागात पावसाची तीव्रता अधिक होती, तर उपनगरात दुपारपासून जोरदार पाऊस झाला, तर उत्तरेकडील दहिसरमध्ये 185.41 मिलिमीटर पाऊस झाला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पावसाच्या आकडेवारीनुसार, हा आकडा बोरिवली पश्चिमेसाठी 146.80, कांदिवलीमध्ये 133 मिमी होता, तर कुलाबा येथे 103 मिमी आणि दक्षिण टोकावरील फोर्ट परिसरात 101 मिमी होता.



हेही वाचा

राज्यभरातील आजची दहावीची पुरवणी परीक्षा रद्द, नवीन तारीख जाहीर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 61.58 टक्के पाणीसाठा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा