Advertisement

मुंबईत मुसळधार पाऊस, येलो अलर्ट जारी

मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस, येलो अलर्ट जारी
SHARES

मुंबईसह उपनगरात रात्री जोरदार पाऊस (Mumbai Rains) सुरू आहे. जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. 

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत, नवी मुंबई आणि ठाण्यात जोरदार पावसाने सोमवारी रात्री पासूनच हजेरी लावली. दरम्यान, मुंबई उपनगरातील (Mumbai Suburban) सांताक्रूझ, कांदिवली आणि अंधेरीत मुसळधार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाने मुंबईच्या (Mumbai Traffic Update) वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पावसाचा जोर असाच जर काहीवेळा कायम राहिला तर पश्चिम उपनगरांत सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे.

कुर्ल्यात मागील एका तासात 39 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर चेंबूरमध्ये देखील धुवांधार पाऊस कोसळत आहे. चेंबुरमध्ये मागील एका तासात 32 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे. 

दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टी भागांत कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस तर मराठवाड्याती काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हवामान विभागाकडून पुढचे काही दिवस सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षता घेता राज्यातील मच्छिमारांना पुढचे काही दिवस मासेमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान विभागानं दिल्या आहेत.

पुढील 4 ते 5 दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन भारतीय हवामान विभागानं केलं आहे. 



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा