Advertisement

मुंबईकरांनो लक्ष द्या, IMD कडून आज यलो अलर्ट जारी

मुंबईत गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस सुरू आहे.

मुंबईकरांनो लक्ष द्या,  IMD कडून आज यलो अलर्ट जारी
SHARES

मुंबईत गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडला असून, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सांताक्रूझ वेधशाळेत १२२ मिमी आणि कुलाबा वेधशाळेत १४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने पुढील २४ तासांत शहरात मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे आणि शुक्रवारी यलो अलर्ट जारी केला आहे. 

राजधान मुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यंदा मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतरही अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस पडला नव्हता. मात्र मागील आठवड्याभरापासून मान्सूनने राज्यातील बहुतांश भाग व्यापून टाकला आहे.

अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून मुंबई आणि ठाण्यासह आठ जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच कोकण किनारपट्टीवर पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा