Advertisement

मुंबईत शनिवार, रविवारी अतिवृष्टीचा इशारा

पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी अति वृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

मुंबईत शनिवार, रविवारी अतिवृष्टीचा इशारा
SHARES

राज्यात गुरुवारी मान्सूनचं (Mumbai Monsoon) आगमन झालं. असं असलं तरी अद्याप मुसळधार पाऊस (Mumbai Rains) पडला नाही. पण शनिवार, रविवारी या दोन्ही दिवशी पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी अति वृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. वेधशाळेनं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या ८ जिल्ह्यांसाठी नारिंगी इशारा (Orange Alert)जारी केला आहे.

१३ जूनला कोकणातले सगळे जिल्हे आणि कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारच्या दिवशी मुंबई(Rain in Mumbai), ठाणे, पुणे, नगर या भागांतही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. रविवारचा दिवसही पावसाचा असेल आणि या दिवशी ८ जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. या भागात अतिवृष्टी होऊ शकते.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?

  • मुंबई
  • ठाणे
  • पालघर
  • रायगड
  • रत्नागिरी
  • सिंधुदुर्ग
  • कोल्हापूर
  • सातारा


विदर्भात वादळी पाऊस

शुक्रवारी विदर्भातही काही भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. नागपूरला संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह, ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. सोमवारीसुद्धा पुणे, नगर, नाशिकसह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडू शकतो, असं भारतीय हवामान विभागाच्या मुंबई उपविभागानं जारी केलेल्या हवामानाच्या अंदाजात म्हटलं आहे.



हेही वाचा

पूर परिस्थितीचे पूर्वानुमान देणारी प्रणाली सज्ज

पावसाच्या हलक्या सरींमुळं उकाड्यात वाढ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा