Advertisement

पावसाच्या हलक्या सरींमुळं उकाड्यात वाढ


पावसाच्या हलक्या सरींमुळं उकाड्यात वाढ
SHARES

सोमवारी सकाळी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसानं मुंबईत हजेरी लावल्यानंतर काहीसा मुंबईकरांना दिलासा मिळाला. सर्वत्र गारठा पसरला होता. परंतु, हवामान विभागानं मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवली असून, अधुनमधून पडणाऱ्या या पावसामुळं मुंबईत प्रचंड उकाडा वाढला आहे. मुंबईत सध्या ढगाळ वातावरण असून, पावसाची शक्यता आहे. मात्र, एकीकडं पाऊस पडत असला तरी, उकाड्यापासून मुंबईकरांची अद्याप सुटका झालेली नाही.

हेही वाचा - मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, तापमानातही घट

कुलाबा वेधशाळेनुसार, ३० अंश सेल्सिअस कमाल तापमान व २७ अंश सेल्सिअसकिमान तापमानाची नोंद झाली आहे. तसंच सांताक्रूझ वेधशाळेनुसार, ३२.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान व २७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारी कमाल व किमान तापमानाची अनुक्रमे कुलाबा वेधशाळेनुसार ३१.८ अंश सेल्सिअस व २७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तसंच, सांताक्रूझ वेधशाळेनुसार ३३.४ अंश सेल्सिअस व २७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

हेही वाचा - दिलासादायक! अखेर 'या' तारखेला मुंबईत दाखल होणार मान्सून

तापमानात अंशता घट झाली असली, उकाडा वाढला आहे. राज्यात निसर्ग चक्रीवादळामुळं अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. तसंच, या वादळाचा फटका मुंबईला ही बसला होता. मुंबईतही जोरदार पावसानं हजेरी लावली होती. त्यावेळी या मान्सूनपूर्व पावसामुळं मुंबईच्या सखल भागांत पाणी साचलं होती. मात्र, दुसऱ्या दिवशी पावसानं चांगली विश्रांती घेतली. त्यामुळं आणखीनच गरम होत होतं.

हवामान विभागानं मुंबईकरांना दिलासादायक बातमी दिली आहे. ती म्हणजे ११ जून रोजी मान्सूनच्या सरी मुंबईत कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मोसमी वारे कर्नाटक आणि गोवा ओलांडून तळकोकणातून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तसंच, बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्यामुळं ६ राज्यात ९ ते ११ जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.



हेही वाचा -

महापालिका रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सज्ज

सामाजिक अंतराच्या नियमांना न जुमानता प्रवाशांचा बेस्ट बसमधून नियमितपणे प्रवास



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा