Advertisement

सामाजिक अंतराच्या नियमांना न जुमानता प्रवाशांचा बेस्ट बसमधून नियमितपणे प्रवास

बसमध्ये सामाजिक अंतराचे नियम लागू केल्यानं अनेकांनी बसून व आरामदायी प्रवासासाठी बसमध्ये चडण्यासाठी एकाच ठिकाणी गर्दी केली.

सामाजिक अंतराच्या नियमांना न जुमानता प्रवाशांचा बेस्ट बसमधून नियमितपणे प्रवास
SHARES

अडीच महिन्याच्या लॉकडाऊननंतर सोमवारी मुंबई पुन्हा एकदा पूर्वपदावर आली. मुंबईत अनेक दुकानं, कारखाने, खाजगी कार्यालयं सुरू झाली. त्यामुळं मुंबईचं सतत गजबजलेलं चित्र पाहायला मिळालं. सोमवारपासून बेस्टनंही बसच्या संख्येत वाढ केली. त्यामुळं प्रवासी संख्या वाढली. दरम्यान, कोरोनाचा धोका अद्याप टळला नसल्यानं नागरिकांनी गर्दी करू असं आवाहन राज्य सरकार व महापालिकेनं केलं आहे. परंतु, बसमध्ये सामाजिक अंतराचे नियम लागू केल्यानं अनेकांनी बसून व आरामदायी प्रवासासाठी बसमध्ये चडण्यासाठी एकाच ठिकाणी गर्दी केली. 

बेस्टनं लॉकडाउनच्या सुरुवातीपासून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी दररोज सुमारे १५०० बससेवा चालविल्या. सोमवारपासून सरकारच्या आदेशानंतर बेस्टने तातडीनं २२०० बस रस्त्यावर आणल्या. मात्र, प्रवासी संख्या लक्षात घेत अत्यावश्यक सेवेसाठी २२०० पैकी ६०० गाड्यांचाचा ताफा पुरविण्यात आला. तर १,६०० बससेवा मुंबईकरांना देण्यात आल्या. परंतु, एका बसमध्ये एका आसनावर एक आणि उभ्यानं पाच अशाप्रकारे ३० प्रवाशांनाच परवानगी देण्यात आली आहे. परंतु, कसंल काय नियमाकडं दुर्लक्ष करत बसमध्ये नेहमीप्रमाणं मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.

कोरोनाचा संसर्ग हा बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही होत असल्यानं कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण होत आहे. त्याशिवाय, बेस्टनं लॉकाडाऊनच्या काळात लोकल बंद असल्यानं आपली सेवा मुंबईसह विरार, कल्याण, बदलापूर, पनवेल पर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळं प्रवास अंतर वाढल्यानं मुंबईतील स्थानिक सेवेला उशिर होत होता. परिणामी एक बस गेल्यानंतर अर्धा पाऊण तास प्रवाशांना बस थांब्यावर उभं राहून बसची प्रतिक्षा करावी लागत होता. 

कोरोनामुळं बेस्टमधील देखभाल विभागातील कामगारांची संख्या सध्या कमी झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामु‌ळं विलगीकरणापासून ते अनेक कामगारांना आजारपणाच्या कारणांनी घरीच थांबण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळं कामगारांची संख्या कमी होत आहे. सोमवारी अनेक बस रस्त्यावर आल्या तरीही त्यातील काही बसमध्ये बिघाड झाल्याचं समजतं.

त्याशिवाय, सोमवार ८ जूनपासून राज्य सरकारनं नियमांमध्ये बदल केल्यानं त्याचे पडसाद लगेच पाहायला मिळाले. कर्मचाऱ्यांनी वेळेआधी ऑफिस गाठण्यासाठी नियमीतपणे बस थांब्यावर गर्दी केली. त्यामुळंं कोरोनाता धोका आधिक वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेत प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचं महत्त्व पटवून देण्यासाठी बेस्टच्या चालकानं अनोखी शक्कल लढवत गणपतीचं रुप घेऊन प्रवाशांना समज दिली.

धारावी आगारातील चालक सचिन जाधव यानं गणपतीचं रूप धारण करून सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून दिलं. पहाटे साडेचार वाजताच तो पनवेलहून सायन चौकीत पोहोचला. त्यानंतर वेशभूषा करुन राणी लक्ष्मी चौक, वांद्रे वसाहत, कलानगर आदी ठिकाणी सुरक्षित प्रवासाचं महत्त्व पटवून देण्याचं काम केलं. सुरक्षित प्रवास करतानाच मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याचाही बहुमोल संदेशही त्यानं दिला.



हेही वाचा -

महापालिका रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सज्ज

'त्या घोटाळेबाजाची संपत्ती पहिल्यांदा ताब्यात घ्या...' न्यायालयाचे आदेश



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा