Advertisement

लाॅकडाऊनमुळं मुंबईतील कचऱ्याचं प्रमाण 'इतकं' घटलं

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबईसह देशभरात लाॅकडाऊन आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई ठप्प झाली आहे. यामुळे मुंबईच्या प्रदूषणात घट झाली आहे.

लाॅकडाऊनमुळं मुंबईतील कचऱ्याचं प्रमाण 'इतकं' घटलं
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबईसह देशभरात लाॅकडाऊन आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई ठप्प झाली आहे.  यामुळे मुंबईच्या प्रदूषणात घट झाली आहे. तसंच हॉटेल, मॉल, दुकाने बंद असल्याने कचरा जमा होण्याचं रोजचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटलं आहे. मुंबईत रोज कचरा जमा होण्याचं प्रमाण 7 हजार मेट्रीक टनावरुन 4 हजार मेट्रीक टनावर आलं आहे.  

लॉकडाऊनमुळे मुंबईत रोज जमा होणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण 30 टक्क्यांनी घटलं आहे. मुंबईत रोज साडेसात हजाराहून अधिक मेट्रिक टन कचरा जमा होतो. यांमध्ये हॉटेल्स, मॉल्स, लॉज, दुकाने आदी मोठय़ा व्यावसायिकांमधून मोठय़ा प्रमाणात कचरा जमा होतो. याची विल्हेवाट पालिकेकडून लावली जाते. व्यापारी संस्था, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, हॉटेल इत्यादींना  कचरयाचे वर्गीकरण करण्याचे निर्देश यापूर्वी पालिकेने दिले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी हवी तशी होत नाही. त्यामुळे जमा होणा-या कच-याची विल्हेवाट पालिकेला करावी लागते. कच-याचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेने मोठय़ा सोसायटय़ांना वर्गीकरण करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यानुसार काही सोसायटय़ांनी याची अंमलबजावणी केली आहे.

हॉटेल्स, मॉल्स, लॉज, मंगल कार्यालये, कॅटरर्स आदी व्यवसाय बंद असल्याने कचरा जमा होण्याचे रोजचे प्रमाण 30 टक्क्यांनी कमी झाले आहे.   देवनार डंम्पिंग ग्राउंडवर सध्या 700 मेट्रीक टन कचरा फेकला जात असून कांजूर डंम्पिंग ग्राउंडवर रोज 3,300 मेट्रीक टन कचरा फेकला जातो.

दरम्यान,  घन कचरा विभागात 33 हजार सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. मुंबईतील गल्लीबोळातून कचरा जमा करत तो डंम्पिंग ग्राउंडपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी चतुर्थ श्रेणी कामगार पार पाडत असतात. सध्या कोरोना विषाणूचा धोका असून 70 टक्के कामगार उपस्थित राहत असून कचरा जमा करण्याचे काम करत आहेत. 



हेही वाचा -

महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या नियमांत पुन्हा बदल, मिळाली एमएमआरमध्ये प्रवासाला मुभा

'मिशन बिगीन अगेन'द्वारे नातेवाइकांसाठी सोसायट्यांचे दार उघडे




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा