Advertisement

मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे.

मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
SHARES

येत्या २४ तासांत मुंबई आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पश्चिम मार्गावरील अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल येथे गेल्या तासाभरात २० मिमी पावसाची नोंद झाली. तर, परळ, भायखळा, वडाळा येथेही १५ मिमी पावसाची नोंद झाली. आता ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे.

आता पुढील चार दिवस मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. आहे

तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबई शहर, उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाडय़ापासून दिलासा मिळाला. मात्र, शनिवारी आणि रविवारी पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या.

दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल आणि २९ जुलै रोजी त्याचे रूपांतर चक्रीय वादळात होईल. ते चक्रीवादळ ओडिशा किनारपट्टीकडून पश्चिम बंगालच्या दिशेने पुढे सरकेल. त्यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईत पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा