Advertisement

मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस, रेल्वे आणि बस सेवा...


मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस, रेल्वे आणि बस सेवा...
SHARES

गुरूवारी सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. सलग दुसऱ्या दिवशी आज मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे.

हवामान खात्याने 1 आणि 2 जुलै रोजी शहरात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत यलो अलर्ट जारी केला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईचा पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, वांद्रे, कुर्ला, सायन, दादर, मुलुंड या सर्व परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.

पावसाचे थेट परिणाम मुंबईच्या लोकलवरही झाले आहेत. काही मिनिटांच्या उशिरानं रेल्वे धावत आहेत. तर, रस्ते वाहतुकीवरही पावसाचे परिणाम दिसून येत आहेत. अंधेरी सब वे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं तर, काही वाहने या पाण्यात अडकली होती. सखल भागात पाणी साचल्यानं पश्चिम उपनगरांतील अनेक भागात वाहतूक खोळंबली होती.

मुंबईत काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे मुंबईच्या सखल भागामध्ये सर्व ठिकाणी पाणी भरले होते, मात्र मध्यरात्री पाऊस थांबल्यामुळे सखल भागांमधून पाणी निघून गेला आहे. आज पहाटे पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे,असंच जोरदार पाऊस सुरू राहिला तर पुन्हा मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात होणार आहे.

मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले. संपूर्ण शहरात रेल्वे आणि बस सेवांना मोठा फटका बसला.

कुर्ला, चेंबूर, सायन, दादर आणि अंधेरीसह मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.

मुंबईत गुरुवारी सकाळी 8 ते रात्री 8.30 पर्यंत बारा तासात कुलाबा  176 मिमी पावसाची नोंद करण्यात आला आहे. मुंबईतील सांताक्रुज 137 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं येत्या 3 ते 4 दिवसांत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या परिस्थितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा