Advertisement

मुंबईत आज कसे असेल पावसाचे स्वरूप? सर्व अपडेट एका क्लिकवर

हवामान खात्याकडून राज्यातील २४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मुंबईत आज कसे असेल पावसाचे स्वरूप? सर्व अपडेट एका क्लिकवर
SHARES

पुढील 2-3 दिवस शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वीकेंडच्या आसपास पाऊस मुसळधार असेल अशी अपेक्षा आहे.

सांताक्रूझ वेधशाळेत 1,043 मिमी पावसाची नोंद झाली आहे, जो आतापर्यंतच्या हंगामाच्या सरासरीच्या 45% आहे. मंगळवार, 11 जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, राजगड, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पुढचे काही दिवस पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज आहे. तर हवामान खात्याकडून राज्यातील २४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नाशिक, नंदूरबार, धुळे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून या वेळी वादळी वारेही वाहतील.

कोकण विभागात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमानामध्ये वाढ जाणवू लागली असून, मुंबईत आठवड्याची सुरुवात उकाड्याने झाल्याची भावना मुंबईकरांनी सोमवारी व्यक्त केली.

ठाणे जिल्ह्यातही पुढील पाच दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचीच शक्यता आहे. या तुलनेत दक्षिण कोकणाच्या तुरळक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाने राज्यात पुढील चार ते पाच दिवस पाऊस संमिश्र राहील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा