Advertisement

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये उभारणार प्राण्यांची डिएनए प्रयोगशाळा

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये लवकरच ही प्रयोगशाळा कार्यान्वित होईल.

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये उभारणार प्राण्यांची डिएनए प्रयोगशाळा
SHARES

वन्यप्राण्यांची डीएनए चाचणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाची प्रयोगशाळा संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये २०२२ पर्यंत कार्यान्वित केली जाईल.

नागपूरमध्ये अशाच प्रकारची प्रयोगशाळा उभारण्यात आली. ती आजपासून कार्यान्वित देखील करण्यात आली आहे. त्याच धरतीवर SGNP मध्ये ही प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे.  

आतापर्यंतअशा वन्य प्राण्याची ओळख पटविण्यासाठी पायांचे ठसे किंवा शरीरावरील ठिपके/पट्टयांचा वापर केला जात होता. आता प्राण्यांची तंतोतंत ओळख होण्याकरिता प्राण्यांची डी.एन.ए चाचणी करणे आवश्यक ठरत असल्याची बाब लक्षात घेऊन वन विभाग स्वत:ची प्रयोगशाळा उभारणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव वॉर्डन सुनील लिमये म्हणाले की, आतापर्यंत राज्यभरात अशा फॉरेन्सिक क्षमतांचा अभाव आहे. जिथे वन्यजीवांचे गुन्हे आणि संघर्ष या दोन्ही गोष्टी समान आहेत.

आमच्या स्वतःच्या सुविधांसह, आम्ही स्कॅट नमुन्यांद्वारे आक्रमक प्राण्यांचा डेटाबेस तयार करू शकतो. हे नंतर उपयोगी पडू शकते. उदाहरणार्थ वाघ किंवा बिबट्यानं माणसावर हल्ला केला आहे. यामध्ये आम्ही संबंधित प्राण्याला काही दिवसात ओळखू शकतो आणि योग्य प्रतिसाद देऊ शकतो, असं सुनील लिमये म्हणाले.

सद्यस्थितीत डी.एन.ए चाचणी करण्यासाठीचे नमुने हैदराबाद आणि भारतीय वन्यजीव संस्थान डेहराडून यांच्याकडे पाठविले जातात. या चाचणीचे परिणाम मिळण्याकरिता अनेक महिने वाट पहावी लागते. दरम्यान मानव वन्यजीव संघर्षात कारणीभूत ठरलेल्या प्राण्याची तंतोतंत ओळख निश्चित करण्यास अडथळा येतो.

याशिवाय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ११ व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार प्राण्याला जेरबंद करण्याचे आदेश काढण्यास अडचण निर्माण होते. डी.एन.ए चाचणीचे परिणाम लवकर प्राप्त व्हावेत याकरिता वन विभागात स्वतंत्र डी.एन.ए चाचणी प्रयोगशाळा उभारत आहे.

संजय गांधी उद्यानातील ही प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्यास अशी प्रयोगशाळा उभारणारा महाराष्ट्राचा वन विभाग देशात पहिला ठरेल. यासाठी ३ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी उद्यान व्यवस्थापनाला उपलब्ध करण्यात आला आहे.



हेही वाचा

तेजस ठाकरेंचं संशोधन, मुंबईतल्या विहिरीत आढळली अंध माशाची प्रजाती

जुहू समुद्र किनारी काळ्या वाळूची चादर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा