Advertisement

मुंबईत गारठा वाढला, पारा १२.३ अंशापर्यंत घसरला

मुंबईसह राज्यभरात पारा कमालीचा खालावला आहे. मुंबईत पारा १२.३ अंशापर्यंत घसरला आहे.

मुंबईत गारठा वाढला, पारा १२.३ अंशापर्यंत घसरला
SHARES

मुंबईसह राज्यभरात पारा कमालीचा खालावला आहे. मुंबईत पारा १२.३ अंशापर्यंत घसरला असून, थंडगार वाऱ्यामुळं मुंबईकर कुडकूडले आहेत. सकाळच्या गुलाबी थंडीचा कडाका वाढत असल्यानं मुंबईकरांनी स्वेटर, ब्लँकेट व उबदार कपडे घालून घरातून बाहेर पडणं पसंत केलं आहे. मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद शुक्रवारी झाली आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळं पुढील काही दिवस तापमानातील घट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबई नजीकच्या परिसरात २ दिवसांपासून पारा घसरत आहे. गुरुवारी कमाल तापमान सरासरी १ ते २ अंशांनी खाली उतरलं. त्यामुळे सकाळपासूनच हवेत असलेला गारवा दुपारीही जाणवत होता.

सांताक्रूझ इथं गुरुवारी २५.३ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली, तर कुलाबा येथील तापमान २६ अंश होते. मुंबईतील बऱ्याच ठिकाणचे तापमान गुरुवारी १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं होतं. बोरिवलीत १३ अंश सेल्सिअस, तर पनवेलमध्ये १२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदलं गेलं. सांताक्रूझ आणि कुलाबा इथं अनुक्रमे १५.४ अंश सेल्सिअस आणि १७.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदलं गेलं.

कोकण विभागातील दिवस आणि रात्रीचे तापमान यंदाच्या हंगामात प्रथमच सरासरीच्या खाली आले आहे. गुरुवारी रत्नागिरी येथे १८.५ अंश किमान तापमान नोंदवले गेले. राज्यातील पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आदी भागांतही किमान तापमान सरासरीखाली आल्यानं या भागात गारवा वाढला आहे. मराठवाडय़ातील उस्मानाबाद, नांदेड येथील किमान तापमान सरासरीखाली गेल्याने येथे गारठा वाढला आहे. विदर्भात सर्वच ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या आसपास असल्याने या भागात थंडी कायम आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा