Advertisement

मुंबई आणि परिसरात हवेचा दर्जा 'धोकादायक' श्रेणीत

सोमवारी कुलाबा इथं २४.६ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ इथं २४.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले.

मुंबई आणि परिसरात हवेचा दर्जा 'धोकादायक' श्रेणीत
SHARES

तापमानात घट होऊन वाऱ्यांचा वेग मंदावल्यानं सोमवारी मुंबई आणि परिसरात हवेचा दर्जा 'धोकादायक' श्रेणीत नोंदला गेला. कमाल आणि किमान तापमानात घट झाल्यानं हुडहुडीही कायम राहिली. सोमवारी कुलाबा इथं २४.६ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ इथं २४.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले.

कुलाबा इथं १६.२ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ इथं १५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दिवसभर हवेत गारवा होता, तर रात्री कडाक्याची थंडी होती.

मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक सोमवारी ३८७ म्हणजेच ‘तीव्र प्रदूषण’ धोकादायक श्रेणीत होता. माझगाव इथं ५७३, कुलाबा इथं ५१३ असा हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला. या दोन्ही ठिकाणच्या हवेने ‘तीव्र प्रदूषण’ श्रेणीचीही मर्यादा ओलांडली होती.

मालाड इथं ४५३, बोरिवली इथं ४५१, चेंबूर इथं ४१६, अंधेरी इथं ४२६ असा हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला. त्यामुळे येथील हवा ‘तीव्र प्रदूषण’ श्रेणीत होती. भांडुप इथं ३८२, वरळी इथं ३४९, वांद्रे कुर्ला संकुल इथं ३२८ असा हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला. त्यामुळे येथील हवा 'अतिवाईट' श्रेणीत होती.

धूलिकणांच्या वादळाचा परिणाम कमी होत जाऊन पुढील दोन दिवसांत मुंबईतील प्रदूषणात काही प्रमाणात घट होणार आहे. तसेच २७ जानेवारीपासून हवेची गुणवत्ता सुधारण्यास सुरूवात होईल. मात्र, पुढील दोन्ही दिवस काळजी घेणे आवश्यक आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा