Advertisement

राज्यात पावसासाठी १५ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार

सध्या मान्सूनला पोषक स्थिती नसल्यामुळे १० जुलैपर्यंत पावसाची परिस्थिती साधारण अशीच राहील. त्यानंतर १५ जुलैपासून राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे.

राज्यात पावसासाठी १५ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार
SHARES

सध्या मान्सूनला (mumbai rains) पोषक स्थिती नसल्यामुळे १० जुलैपर्यंत पावसाची परिस्थिती साधारण अशीच राहील. त्यानंतर १५ जुलैपासून राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस (Rain) पडेल, अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. मात्र, त्यामुळं पेरणी करुन बसलेल्या शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावात मिळून केवळ १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा अधिक आहे. मात्र अद्याप मुंबईत धरणक्षेत्रात पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी अतिशय धिम्या गतीने वाढत आहे. यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात यंदा मान्सून हा वेळेवर दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. राज्यात दमदार पाऊस बरसणार आणि पिकंही चांगले होणार अशी अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला होती. पण सुरुवातीचे काही दिवस बरसल्यानंतर पावसाने अक्षरशः पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा