थंडिमुळे मुंबईकर चांगलेच गारठले आहेत. रविवारपासून मुंबईतच्या तापमानात घट होताना दिसत आहे. रविवारी 17.5 इतक्या कमी तापमानाची नोंद झाली. तर सोमवारी सकाळी 13.7 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवले गेले. त्यामुळे सोमवार हा दशकभरातील डिसेंबरचा सर्वात थंड दिवस म्हणून नोंदवला गेला आहे.
सांताक्रूझमध्ये 13.7 अंश सेल्सिअस थंडीची नोंद झाली, जे आतापर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी आहे. केवळ तीन दिवसांत तापमान 11 अंशांनी घसरल्याने हे सामान्यपेक्षा 5.6 अंशांनी कमी झाले. याउलट कुलाबा वेधशाळेत 19.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
शुक्रवारपर्यंत किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली राहण्याची शक्यता असून थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज आहे.
IMD च्या अंदाजानुसार, बुधवारपर्यंत किमान तापमान 17 अंश सेल्सिअसच्या खाली राहील. आठवड्याच्या शेवटी हळूहळू 19-21 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल.
हेही वाचा