Advertisement

IMD कडून 9 जिल्ह्यांना अति-मुसळधार पावसाचा इशारा

तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती आहे जाणून घ्या.

IMD कडून 9 जिल्ह्यांना अति-मुसळधार पावसाचा इशारा
SHARES

23 सप्टेंबर पासून राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. कालपासून अनेक ठिकाणी पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. आजही राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

ठाणे जिल्ह्यात विजांचा कडकडाट

ठाण्यासह उपनगरात रात्री आणि पहाटेच्या सुमाराला पाऊस झाला आहे. उपनगरात अर्धा तास झालेल्या धो- धो पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. विजांच्या कडकडाटासह ठाणे जिल्ह्यात पाऊस झाला आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे सांगितले आहे. या भागांमध्ये कालही मुसळधार पाऊस कोसळत होता. आजही अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तीन दिवस पालघर आणि ठाण्यात यलो अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढचे तीन दिवस पालघर आणि ठाण्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईत आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडेल.

विदर्भ आणि मराठवाड्यातही यलो अलर्ट

विदर्भ आणि मराठवाड्यातही आज यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. परभणी, बीड, नांदेड, हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा आज IMD कडून देण्यात आला आहे.

मोबाईलमध्ये चाइल्ड पॉर्न ठेवणे, डाऊनलोड करणे आणि पाहणे ठरणार गुन्हा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबईतही मुसळधार पाऊस

मुंबईतही रात्री उशिरा मुसळधार पाऊस झाला आहे. मागच्या दोन दिवसांपासून मुंबईत उकाडा वाढला होता. अचानक झालेल्या पावसामुळे थंडावा निर्माण झाला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

पुण्यात उद्या अति मुसळधारचा इशारा

पुण्यात उद्या म्हणजेच 25 सप्टेंबरला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सांगली वगळता उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना छत्री, रेनकोट घेऊन घराबाहेर पडा.



हेही वाचा

नवी मुंबई: फ्लेमिंगोच्या संरक्षणासाठी एलईडी दिवे बदलणार

बेकायदेशीरपणे वृक्षतोड करणाऱ्यांना आता अधिक दंड भरावा लागणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा