Advertisement

कंपोस्ट खताची निर्मिती करणं बंधनकारक


कंपोस्ट खताची निर्मिती करणं बंधनकारक
SHARES

मुंबई - 20 हजार चौरस मीटरपेक्षा अधिक चटई क्षेत्रफळ असणाऱ्या सोसायट्या, मॉल्स आणि हॉटेल्सना कंपोस्ट खताची निर्मिती करणं बंधनकारक आहे. मात्र सोसायट्या, मॉल्स आणि हॉटेल्स या नियमांचं पालन करत नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी याची गंभीर दखल घेतलीय. सेंद्रीय खताचा प्रकल्प न राबवणाऱ्या सोसायट्या, हॉटेल्स आणि मॉल्सविरोधात तातडीनं कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. शनिवारी आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांची मासिक आढावा बैठक घेतली. त्यावेळी हे आदेश दिले.

मे 2017 पर्यंत पावसाळ्यापूर्वीची कामं पूर्ण करा

2016मध्ये कुठे आणि किती वेळा पाणी तुंबले याचा शोध घ्यावा. तसंच वारंवार पाणी तुंबणारी ठिकाणं शोधून काढा. पाणी साचू नये यादृष्टीनं आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा आणि मे 2017 पर्यंत पावसाळ्यापूर्वीची कामं पूर्ण करा, असे आदेशही आयुक्तांनी दिलेत.

वॉटर हायड्रंटची माहिती अॅपवर

पालिका क्षेत्रातील जलस्त्रोतांसह जे वॉटर हायड्रंट कार्यान्वित आहेत. त्या वॉटर हायड्रंटचे मॅपिंग करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. त्यानुसार जलस्त्रोत आणि वॉटर हायड्रंट मॅपिंगची सर्व माहिती आपत्कालीन व्यवस्थापनाच्या संकेतस्थळासह अॅपवर उपलब्ध करून देण्यात येणाराय. त्यामुळे आगीची दुर्घटना घडल्यास जवळपास कुठे जलस्त्रोत आहेत याची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला उपलब्ध होऊ शकेल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा