Advertisement

वॅक्ख्यॅ..विख्खी..ओखी! ओखी वादळावरचे 'हे' व्हायरल विनोद तुम्हालाही आलेत का!

एकीकडे परिस्थितीचा सामना करण्याची पराकाष्ठा सुरु असते, तर दुसरीकडे ताण कमी करण्यासाठी कठीण प्रसंगातूनही विनोद निर्माण करण्याची हातोटी मुंबईकरांकडे आहे! ओखी वादळामुळे एकीकडे पालिका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिस यंत्रणा परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करत असताना काही मुंबईकरांनी या परिस्थितीतही ताण कमी करण्यासाठी भन्नाट विनोदाचा आधार घेतला.

वॅक्ख्यॅ..विख्खी..ओखी! ओखी वादळावरचे 'हे' व्हायरल विनोद तुम्हालाही आलेत का!
SHARES

कोणत्याही आपत्तीमध्ये मुंबईकर कायम पाठीचा कणा ताठ ठेऊन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार असतो. त्याचं 'मुंबई स्पिरीट' हे अशा प्रसंगी लगेच दिसून येतं. पण त्याच वेळी, अशा गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी काही मुंबईकर 'क्रिएटिव्ह' मार्ग निवडतात. अशा प्रसंगी एकीकडे परिस्थितीचा सामना करण्याची पराकाष्ठा सुरु असते, तर दुसरीकडे ताण कमी करण्यासाठी कठीण प्रसंगातूनही विनोद निर्माण करण्याची हातोटी मुंबईकरांकडे आहे!

ओखी वादळामुळे एकीकडे पालिका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिस यंत्रणा परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करत असताना काही मुंबईकरांनी या परिस्थितीतही ताण कमी करण्यासाठी भन्नाट विनोदाचा आधार घेतला. हे विनोद जर आपण वाचले, तर आपल्या डोक्यावरचा ताण काही प्रमाणावर का होईना, कमी होतो हे निश्चित!


ओखीमध्ये सर्वाधिक अॅक्टिव्ह झाला तो कर्मचारी वर्ग. कारण, सर्वाधिक त्रास याच वर्गाला सोसावा लागत आहे. काही खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वत:चं दु:ख यानिमित्ताने बोलून दाखवलंय! ते म्हणतात:


शाळा, कॉलेज काय बंद करताय?

हिंमत असेल तर माझं ऑफिस बंद करून दाखवा

- एक भडकलेला कर्मचारी!


तर दुसरा विचारतोय:

शाळांना सुट्ट्या

कॉलेजला सुट्ट्या

मग आम्ही प्रायव्हेट कामगार काय सुपरमॅन आहोत काय?


एकाने तर 'होय, मी लाभार्थी' म्हणत थेट दिवाळी बोनसचीच घोषणा केली!

च्या मायला पुन्हा पावसाळा आला

आता दिवाळी येणार..परत बोनस

होय हे माझं सरकार..मी लाभार्थी!


आत्ताच्या शाळांना मिळालेली सुट्टी पाहून मागच्या पिढीतला एक 'माजी शाळकरी' विद्यार्थी म्हणतोय:

आम्ही शाळेत असताना ही वादळं

कुठे मेलेली काय माहीत????


तर, कायम पिढ्यांची उदाहरणं झेलणारे सध्याचे पिढीकार म्हणतायत:

आता आम्हीही म्हणू शकतो -

आम्ही तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले आहेत!


काही सर्वसामान्य मुंबईकर तर थेट देवालाच जाब विचारत आहेत!

पावसाळ्यात उन्हाळा, उन्हाळ्यात थंडी,

थंडीत पडतोय पाऊस,

देवा तुझ्या 'कॉम्प्युटरचा' 

बिघडलाय काय रे 'माऊस'?


तर काहींनी थेट दोन ऋतुंची झोप काढून घेतली!

च्यायला.!

काल रात्री हिवाळ्यात झोपलो...

आज सकाळी पावसाळ्यात उठलो...

५, ६ महिने जास्त झोप झाली वाटतं!


एकाला एका रात्रीत ऋतु बदलल्याचं आश्चर्य वाटतंय...

रात को जब सोये, तब तक मुंबई था ।

सुबह उठे, तो लोनावाला हो गया ।


आता खोचक विनोद म्हटलं की पुणेकरांना कसं विसरून चालेल? कथित पुणेकरांच्या नावानेही एक जोक हळूच व्हायरल झाला!

आमच्याकडे हिवाळ्याच्या स्वेटरला 

पावसासाठी प्लॅस्टिक लाऊन मिळेल!

- पुणेरी दुकान


अशोक सराफ यांच्या धुमधडाका चित्रपटाची आठवण इथे एकाला झालीये! तो म्हणतोय,

ह्या वादळाचा शोध बहुधा अशोक सराफ यांनी 

धुमधडाका चित्रपटात लावला असावा...

वॅक्ख्या विक्खी ओखी!


व्हॉट्सअॅपसोबतच फेसबुकवरही विनोदांचा भडिमार सुरु होता!




या बातमीमधून कोणत्याही प्रकारे ओखी वादळ किंवा त्यातून होणारं नुकसान याची टर उडवणं किंवा चेष्टा करण्याचा हेतू अजिबात नाही. मात्र, संकटकाळातही अशा काही गोष्टींमुळे तणाव कमी होत असेल, आणि तो करण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो फारसा गांभीर्यानं न घेता आपणही आपल्यावरचा ताण कमी करून घ्यावा! कदाचित हे तुम्ही वाचत असेपर्यंत मुंबईत ऋतु अजून बदलले असतील! कुणास ठाऊक!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा