Advertisement

मुंबईकरांना जाणवतोय 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा

शुक्रवारी ही तीच परिस्थिती असल्यामुळं मुंबईकरांना 'ऑक्टोबर हिट'चा (october heat) तडाखा जाणवू लागला.

मुंबईकरांना जाणवतोय 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरातील तापमानात (temperature) प्रचंड वाढ झाली आहे. दररोज मुंबईकरांना सकाळी ढगाळ हवामान, दुपारी ऊकाडा, संध्याकाळी पुन्हा थंड अशा वातावरणाच्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. दरम्यान, गुरुवारी मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिक उकाड्यानं हैराण झाले होते. त्यात शुक्रवारी ही तीच परिस्थिती असल्यामुळं मुंबईकरांना  'ऑक्टोबर हिट'चा (october heat) तडाखा जाणवू लागला.

भारतीय हवामान (Weather) खात्याच्या वेळापत्रकानुसार, ८ ऑक्टोबर रोजी मान्सून मुंबईतून परतीचा प्रवास सुरू करणार होता. मात्र, हवामानात सातत्यानं बदल होत असून, परतीचा मान्सून अद्यापही गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशासह उत्तर अरबी समुद्रातच आहे. मुंबईत गुरुवारी सकाळपासून पावसाचं वातावरण होतं.

९ ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील अंतर्गत भागात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांत १० ऑक्टोबरपासून पावसाचं प्रमाण वाढेल. ही स्थिती पुढचे ६, ७ दिवस राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तविला आहे.



हेही वाचा - 

आता खासगी बसमधूनही १०० टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी

रेल्वेत प्रवास करण्याची परवानगी मिळाली, पण डबेवाले क्यूआर कोडमुळे त्रस्त



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा