Advertisement

किसानकनेक्टच्या रोपांचे घरपोच वितरण

एक आठवडाभर चालणाऱ्या वार्षिक वन महोत्सवाची सुरुवात दिनांक १ जुलै रोजी झाली, ज्यामध्ये मुंबई आणि पुण्यातल्या ७०००हून जास्त घरांना औषधी व ऑक्सीजनचा पुरवठा करणाऱ्या वनस्पतींची रोपे त्यांच्या घरी मिळवून उत्सव साजरा करण्याची संधी मिळणार आहे.

किसानकनेक्टच्या रोपांचे घरपोच वितरण
SHARES

एक आठवडाभर चालणाऱ्या वार्षिक वन महोत्सवाची सुरुवात दिनांक १ जुलै रोजी झाली, ज्यामध्ये मुंबई आणि पुण्यातल्या ७०००हून जास्त घरांना औषधी व ऑक्सीजनचा पुरवठा करणाऱ्या वनस्पतींची रोपे त्यांच्या घरी मिळवून उत्सव साजरा करण्याची संधी मिळणार आहे, ज्यामुळे ते त्यांच्या बागांमध्ये, टेरेस गार्डनमध्ये किंवा इतर परिसरांमध्ये त्यांची लागवड करु शकतील. ’

किसानकनेक्ट या राज्यातल्या जलद गतीने प्रगती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या भाज्या व फळांच्या ऑनलाइन मार्केटप्लेसने हा पहिला वहिला, अगदी वेगळा व भारतातला सर्वात मोठा उपक्रम सुरु केला आहे, ज्यामध्ये मुंबई व पुण्यातील जवळपास ७०००हून जास्त कुटुंबांना त्यांच्या घरी रोपे मोफत दिली जाणार आहेत. महाराष्ट्रासोबत संपूर्ण देशाला या १ जुलै ते ७ जुलै दरम्यान होणाऱ्या व्हॅन महोत्सवाची उत्सुकता लागली आहे. किसानकनेक्टने जनतेला औषधी व ऑक्सीजनचा पुरवठा करणाऱ्या रोपांची त्यांच्या घरात लागवड करुन वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेण्याची व त्यांच्या घरच्या व आसपासच्या वातावरणाचे संरक्षण करण्याची विनंती केली आहे. 

या उपक्रमाच्या अंतर्गत, किसानकनेक्ट ७ जुलैपर्यंत मुंबई व पुण्याच्या लोकांना घरपोच ७००० रोपांचे वितरण करणार आहे. तुळस, कोरफड आणि मनी प्लॅंटसारख्या औषधी गुणविशेष असलेल्या आणि ऑक्सीजनचा पुरवठा करणाऱ्या रोपांचे वितरण केले जाणार आहे.      

दररोज किसानकनेक्ट दोन्ही शहरांमधल्या साधारण १००० लोकांना रोपांचे वितरण करेल. संस्थेने मुंबई व पुण्यातील पर्यावरणाप्रति सजग असलेल्या ७००० कुटुंबांची सर्वेक्षणामार्फत निवड केली आहे, यामध्ये लोकांच्या पर्यावरण सुलभ सवयी व उपक्रमांचे मापन करण्यात आले होते. स्वच्छ, ताज्या व पोषक भाज्या व फळांचा वापर करुन या कुटुंबांनी आधीपासून अधिक चांगल्या व योग्य खाण्याच्या सवयी बाणवल्या आहेत. त्यांचे रोपे देऊन किसानकनेक्टमार्फत कौतुक केले जाणार आहे. किसानकनेक्टच्या बंधुंनी १ जुलैपासून रोपांचे वितरण सुरु केले होते. दोन दिवसांमध्ये ३००० हून जास्त रोपांचे वितरण करण्यात आले आहे. 

'लोकांनी चांगल्या पर्यावरणाच्या गरजेला समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे, असे चांगले पर्यावरण ज्यामध्ये ऑक्सीजनचा पुरवठा करणा-या व औषधी वनस्पती या महाभयंकर आजारानंतर महत्वाची भूमिका पार पाडतात. व्हॅन महोत्सवाचे वेगळेपण दर्शवून देण्यासाठी आम्ही भारतातल्या पहिल्या उपक्रमाची सुरुवात केली आहे, ज्यामध्ये लोकांना कुठेही बाहेर नव्हे तर घरपोच रोपे मिळतील.  महामारीच्या दुसऱ्या लाटेचे गांभीर्य व मर्यादा लक्षात घेऊन, आम्ही ऑक्सीजनयुक्त व औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी घर हे उत्तम ठिकाण असेल असा निकष काढला, यामुळे कुटुंबांना रोपे सुरक्षित व हायजिनिक स्थितीत ठेवू शकतील. याशिवाय ते घरच्या घरी मुलांसोबत वृक्षारोपण करु शकतील. आम्हाला लोकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांनी आमच्या विनंतीवरुन अधिकाधिक रोपे लावण्याचा पण केला आहे', असे किसानकनेक्टचे ऍग्रोनॉमिस्ट विनोद गुंजाळ म्हणाले. 

झाडांमुळे अन्नाच्या स्त्रोतांची निर्मिती वाढते त्याचप्रमाणे पर्यावरणाची स्थिती देखील सुधारते, त्यामुळे त्यांनी झाडे लावायला हवीत, असा संदेश आम्ही मुलांना देत आहोत. आम्ही हा संदेश रोपांसह देत आहोत, ज्यामुळे  झाडे लावणे हे प्रत्येकाची जवाबदारी का आहे, याला अधोरेखीत करण्यास मदत मिळेल. आम्ही या उपक्रमाला आणखीन मोठा बनवणार असून, अधिकाधिक मुलांना यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत.

या महमारीला दिलेला प्रतिसाद म्हणून, आरोग्याप्रति जागरुक बनल्यामुळे लोक शेतावरच्या ताज्या, सुरक्षित, व स्वच्छ भाज्या व फळांना पसंती देऊ लागले आहेत. तंत्रज्ञानाने त्यांची थेट शेतांमधून भाज्या व फळे खरेदी करण्याची इच्छा पूर्ण केली आहे, ते आता ऑनलाइन ऑर्डर करु शकतात. आरोग्याबद्दल जागरुक बनत असल्यामुळे आमची भेट म्हणून मिळालेले रोप त्यांना पर्यावरणाबद्दल देखील सजग बनवेल. किसानकनेक्टने आरोग्य व पर्यावरणाप्रति जागरुक पिढी घडवण्याचा निर्धार केला आहे.”.

व्हॅन महोत्सवाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे, लोकांना झाडे लावण्यासाठी व देशामध्ये अधिकाधिक वने तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उत्सव दर वर्षी जुलैमध्ये साजरा केला जातो. महाराष्ट्र शासन देखील व्हॅन महोत्सव साजरा करत आहे आणि वृक्षारोपणामार्फत लोकांना पर्यावरणाप्रति जागरुक होण्याची विनंती करत आहे.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा