Advertisement

अबब अजगर...


SHARES

भांडुप - अजगर.. नाव घेतलं तरी थरकाप उडतो... हा अजगर तुमच्या समोर आला तर... ऐकूनच घाम फुटला ना? मात्र भांडूपमध्ये प्लॅण्ट अॅण्ड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटीच्या स्वयंसेवकांनी अजगर चक्क हातात पकडलाय. आणि एक नाही तर भले मोठे दोन अजगर. एक नर जातीचा आणि एक मादी जातीचा. यावेळी त्यांनी जखमी ब्लॅक शोल्डर घारीचीही सुटका केली.

शहरीकरणाच्या नादात मुंबई आणि मुंबई बाहेरची जंगलं नष्ट होऊ लागलीत. त्याचाच परिणाम की काय अजगर, साप यांसारखे प्राणी भर वस्तीमध्ये आढळू लागलेत. त्यामुळे कदाचित तुमच्या परिसरात अजगर आढळला तर न घाबरता त्यांना दुखापत न करता तुम्ही प्राणी मित्रांच्या सहाय्याने त्यांना जंगलात सोडा.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा