Advertisement

मुंबई, नवी मुंबईत हलक्या सरींचा शिडकावा

15 जूनपर्यंत राहणार अशीच परिस्थिती

मुंबई, नवी मुंबईत हलक्या सरींचा शिडकावा
SHARES

मुंबई आणि उपनगरात रिमझिम पाऊस पडत आहे. तसेच 10 ते 15 जून दरम्यान महाराष्ट्रात हलका पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला होता. 

मुंबई आणि नवी मुंबईच्या काही भागांत रविवारी पूर्व मोसमी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला.

मुंबई तसेच नवी मुंबईत जोरदार वाऱ्यांमुळे रविवारी अनेक ठिकाणी धुळीचे लोट उसळले. मुंबईत दुपारपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ठिकठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिक सुखावले. 

अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला असलेला धोका टळल्याची माहिती हवामान विभागाने रविवारी दिली.

चक्रीवादळ रविवारी मुंबईपासून ५८० किलोमीटरवर, गुजरात पोरबंदरपासून ४८० किलोमीटर तर कराचीपासून ७८० किलोमीटरवर होते. हे चक्रीवादळ गुजरातमधील कच्छ आणि पाकिस्तानातील कराची दरम्यानच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.

सध्या चक्रीवादळ कच्छच्या वायव्येस अरबी समुद्रात ६१० किलोमीटर आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर सोमवारी सुमारे ५० किलोमीटर प्रती तास, मंगळवार आणि बुधवारी सुमारे ७० किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहू शकतात. गुरुवारी वाऱ्याचा वेग ७५ किलोमीटर प्रती तासांवर जाऊ शकतो.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा