काळा घोडामध्ये मुलांची चमकदार कामगिरी

 Mumbai
काळा घोडामध्ये मुलांची चमकदार कामगिरी

काळाघोडा - काळाघोडा चिल्ड्रेन आर्ट इन्स्टॉलेशन 2017 या स्पर्धेत आदित्य बिर्ला वर्ल्ड अॅकॅडमीतल्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवलाय. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून घोडा तयार केला होता. दिनेश दत्ता यांनी या मुलांना प्रशिक्षण दिलं होतं. हे विद्यार्थी पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करून एक चांगलं भविष्य घडवतील असा विश्वास यावेळी दिनेश दत्ता यांनी व्यक्त केला.

Loading Comments