Advertisement

मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात तुरळक पाऊस

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचा परिणाम राज्याच्या काही भागांवर होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात तुरळक पाऊस
SHARES

महाराष्ट्रातील (maharashtra) हवामानात लक्षणीय बदल होत आहे. सततच्या वातावरणातील चढ-उतारामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होताना दिसतो आहे.

मागील अनेक दिवासांपासून मुंबईसह (mumbai) राज्यभरात कडाक्याची थंडी होती. आता मात्र थंडीचा कडाका कमी होत आहे. मात्र आता थंडीनंतर अचानक राज्यभरातील अनेक भागात पावासाच्या सरींनी हजेरी लावली.

मुंबईसह रायगडमध्येही पावसाच्या सरी (rain) कोसळल्या. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचा परिणाम राज्याच्या काही भागांवर होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील एकूण 6 जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात ढगाळ हवामान असेल. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

27 जानेवारीपासून महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी होईल, परंतु दिवसा तापमानात वाढ आणि उष्ण हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकण आणि मुंबई परिसरातही ढगाळ वातावरण आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच मुंबई-ठाणे (thane) परिसरात सकाळी हलक्या धुक्यासह पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली.

मुंबईत दुपारीही आकाश अंशतः ढगाळ असेल. किनाऱ्यावर मध्यम ते जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

दुपारी काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान 28 ते 32अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 ते 22 अंश सेल्सिअसपर्यंत असेल.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे (pune), सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात हवामान कोरडं असेल. तर दुपारनंतर तापमानात वाढ होऊन उष्णता जाणवेल.

कमाल तापमान 29 ते 33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 ते 18 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार भागातही दिवसभर ढगाळ हवामान असेल. उत्तर महाराष्ट्रात हवामान खात्याने काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि लातूर भागातही ढगाळ वातावरण असेल. 27 आणि 28 जानेवारी रोजी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये हवामान अंशतः ढगाळ असेल. तर काही भागात हलक्या सरींची शक्यता आहे.



हेही वाचा

राष्ट्रीय ई-मोबिलिटी उपक्रमांतर्गत मुंबईला नवीन इलेक्ट्रिक बस मिळणार

समृद्धी महामार्गावर 14 फूड प्लाझा सुरू होणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा