भांडूपमध्ये सापडला साप

 Mumbai
भांडूपमध्ये सापडला साप
भांडूपमध्ये सापडला साप
See all

एलबीएस मार्ग - भांडुप पश्चिमेकडील एलबीएस मार्गावर असलेल्या मेट्रो माॅल समोरील नाल्याच्या कडेला शनिवारी रात्री चार फुटी साप दिसल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीय. नागरीकांनी या सापाला बघण्यासाठी जमा झाले आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले. रस्त्यावरून जात असलेल्या तुषार कांबळी या भांडुपकर तरूणानं नागरिकांना थांबवून लगेच पोलीस नियंत्रण कक्षाच्या १०० नंबरला काॅल केला. तसेच त्याने सर्पमित्र केतन सावंत यालासुद्धा माहिती दिली. दरम्यान घाबरलेले नागरिक सापाला मारून टाकतील या भीतीनं कांबळी यानं जमलेल्या घोळक्यातील तरुण अयप्पा याच्या मदतीनं तब्बल अर्ध्यातासाच्या अथक प्रयत्नानंतर कसाबसा साप पकडण्यात यश मिळवलं. पोलीस परवानगीने सर्पमित्र सावंत आणि भाग्येश यांच्या मदतीने मध्यरात्रीच्या सुमारास बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सापाला सोडण्यात आलं.

Loading Comments