जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

  Kandivali
  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम
  मुंबई  -  

  जगभरात 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने मुंबई आणि पर्यावरण अधिक सुंदर कसं होईल? यावर भर देण्यासाठी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन कांदिवलीतील ग्रोवेल्स 101 मॉलतर्फे करण्यात आले होते. 

  'पीपल्स मुव्हमेंट मिशन ग्रीन, मुंबई' यांच्या सहकार्याने हा मार्गदर्शनपर कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. शुक्रवारी आणि शनिवारी राबवण्यात आलेल्या या कार्यक्रमातून मॉलमध्ये येणाऱ्या नागरिकांना पर्यावरण संवर्धनात आपले योगदान देण्याविषयी आवाहन करण्यात आले. सेल्फ वॉटरिंग प्लान्ट्स, आठवड्यातून एकदा पाणी घालायला लागणारी झाडे, स्वत:चे व्हर्टिकल गार्डन कशी तयार करावे, कंपोस्ट खत कसे तयार करावे?, कचरा व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, झाडे वाळण्यापासून कसा बचाव कराल? या विषयी माहिती दिली गेली. या कार्यक्रमादरम्यान नागरिकांना पर्यावरणाविषयी आणखी माहिती मिळावी म्हणून प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांसाठी 'सेव्ह ट्रीज' या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

  कचरा गोळा करून फळांच्या बियांबरोबर त्या पॅक करून नागरिकांना वाटण्याचा उपक्रमही यावेळी हाती घेण्यात येणार आहे. या उपक्रमाबरोबरच ‘से नो टू प्लॅस्टिक’ यासाठी देखील ग्रोवेल्स मॉलतर्फे प्रयत्न करण्यात येणार आहेत. पर्यावरणाचे रक्षण करणे ही सध्या शहरांची सर्वात मोठी गरज आहे. 'मिशन ग्रीन मुंबई'तर्फे संपूर्ण शहरात अशा प्रकारचे अनेक उपक्रम हाती घेतले जात आहेत. त्यांनी या उपक्रमांच्या माध्यमातून 20 हजारांहून अधिक झाडेही लावली आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.