Advertisement

मुंबईच्या तापमानात घट, मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता


मुंबईच्या तापमानात घट, मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता
SHARES

मुंबईतील तापमानात मागील काही दिवसांपासून प्रचंड वाढ झाली होती. वाढत्या तापमानामुळं मुंबईकरांना उकाड्याच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. परंतु, भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, पावसानं सोमवारी पहाटेच्या सुमारास हजेरी लावत मुंबईकरांना सुखद धक्का दिला.

मुंबईत रविवारी ३६ अंश सेल्ससिअस तापमानाची नोंद झाली. परंतु, दक्षिणपूर्व आणि लगतच्या मध्यपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळं चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं सोमवारी मुंबईत ढगाळ वातावरण असून मुंबईतील तापमानात घट झाली आहे. मुंबईत सोमवारी ३५.८ कमाल व २६.८ किमान तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा - Mumbai Rain : मान्सूनचे केरळात आगमन, लवकरच दाखल होणार महाराष्ट्रात

तापमानात घट झाल्यानं मुंबईत थंड वारे वाहत आहे. तसंच ढगाळ वातावरणामुळं उकाड्याच्या त्रासापासून दिलासा मिळाला आहे. त्याशिवाय, येत्या ४८ तासात मुंबईसह ठाणे, पालघर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत १५ जूननंतर दाखल होणाऱ्या पावसाने जूनच्या पहिल्या दिवशी दाखल झाला आहे.

३ आणि ४ जूनला महाराष्ट्रातल्या काही भागात आणि गुजरातमध्ये वादळी पावसाचासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानंं जाहीर केलं की, येत्या ४८ तासात दक्षिण-पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होत असल्यानं राज्याच्या बहुतांश भागाला पुढील चार दिवस वादळी पावसाचा  तडाखा बसण्याची शक्यता आहे. ३ ते ४ जून कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.



हेही वाचा -

Mumbai Rain: IMD चा इशारा, मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

महाराष्ट्राच्या मदतीला केरळ, 'इतक्या' डॉक्टर्स, नर्सचं पथक मुंबईत दाखल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा