मुंबईतल्या 'बर्ड रेस'बद्दल ऐकलं आहे का?

बर्ड रेस म्हटलं की, सर्वसामान्यांना घोड्यांच्या शर्यतीप्रमाणे कोंबड्या आणि कबुतरांची शर्यत असल्यासारखं वाटेल. पण तसं अजिबात नाही. १२ वर्षांपूर्वी हाँगकाँग बर्ड रेसवरून प्रेरणा घेऊन मुंबई बर्ड रेस सुरू करण्यात आली होती. यावर्षी मुंबईत ४ फेब्रुवारीला बर्ड रेसचं आयोजन करण्यात आलं आहे. फक्त मुंबईतच नाही, तर केरळ, हैदराबाद, पुणे, नागपूर, चेन्नई, अहमदाबाद आणि बंगळुरु या आठ शहरांमध्ये बर्ड रेस आयोजित केली जाते.

  • मुंबईतल्या 'बर्ड रेस'बद्दल ऐकलं आहे का?
SHARE

माणसे, भाषा आणि संस्कृतीच्या बाबतीत मुंबई ही बहुरंगी आणि बहुढंगी आहे यात काही शंका नाही. पण ती तितकीच निसर्गाच्या बाबतीत देखील बहुरंगी आहे. कारण समुद्राचे आणि जंगलाचे सान्निध्य या मुंबापुरीला लाभले आहे. म्हणूनच या महानगरीत स्थिरावलेल्या आणि अधुन-मधून भेटी देणाऱ्या पक्ष्यांची समृद्धताही तितकीच आहे. ही समृद्धता किती आहे आणि त्यात किती बदल झाले? हे रविवारी म्हणजेच ४ फेब्रुवारीला होणाऱ्या 'बर्ड रेस' या मोहिमेतून नक्कीच कळेल.


हा काय प्रकार आहे?

बर्ड रेस म्हटलं की, सर्वसामान्यांना घोड्यांच्या शर्यतीप्रमाणे कोंबड्या आणि कबुतरांची शर्यत असल्यासारखं वाटेल. पण तसं अजिबात नाही. १२ वर्षांपूर्वी हाँगकाँग बर्ड रेसवरून प्रेरणा घेऊन मुंबई बर्ड रेस सुरू करण्यात आली होती. यावर्षी मुंबईत ४ फेब्रुवारीला बर्ड रेसचं आयोजन करण्यात आलं आहे. फक्त मुंबईतच नाही, तर केरळ, हैदराबाद, पुणे, नागपूर, चेन्नई, अहमदाबाद आणि बंगळुरु या आठ शहरांमध्ये बर्ड रेस आयोजित केली जाते.बर्ड रेस म्हणजे काय?

सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत तुम्ही शहरात आणि शहराच्या उपनगरात जास्तीत जास्त पक्ष्यांच्या जाती बघायच्या. एकप्रकारे तुम्ही याला पक्षी गणना म्हणू शकता. पक्ष्यांच्या हालचालींवर आणि सद्य स्थितीवर नजर ठेवण्यासाठी दरवर्षी बर्ड रेसचं आयोजन करण्यात येतं. दरवर्षी ६० ते ७० ग्रुप्स बर्ड रेसमध्ये सहभागी असतात.

मुंबईतल्या तीन ठिकाणी पक्ष्यांनी गणना होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, धारावीतील महाराष्ट्र नेचर पार्क आणि कुलाबामधील सागर उपवन गार्डन या ठिकाणी तुम्ही पक्षी गणना करू शकता. तर मुंबईजवळील कर्नाळा पक्षी अभयारण्य, उरण बीच, अलिबागचा समुद्रकिनारा, कर्जत-डोंबिवली-कल्याण-अंबरनाथ परिसर, वसई-विरार परिसर, ठाणे खाडी या ठिकाणांचा देखील तुम्हाला पर्याय आहे.


कशी करतात पक्षीगणना?

पक्षी गणना करण्यासाठी तुमच्याकडे स्वत:ची एक टीम लागते. या टीममध्ये चार सदस्य असतात. टीम सदस्यांनी शहराच्या उपनगरात आणि आजूबाजूला जास्तीत जास्त पक्ष्यांच्या जाती पाहायच्या. त्यानंतर एकत्र जमून सगळ्यांच्या नोंदी जमा करायच्या. ज्या संघाने सर्वात जास्त पक्षी बघितले, तो संघ विजयी घोषित केला जातो. संघाला दिलेल्या नोंदपुस्तिकेमध्ये मुंबईच्या आसपास दिसणाऱ्या सर्व पक्ष्यांची नावं असतात. जर तुम्हाला एखादा पक्षी दिसला, तर त्या पक्ष्याच्या नावासमोर खूण करायची आणि तो जिथे दिसला त्या ठिकाणाची नोंद करायची. प्रत्येक संघातील तीन सदस्यांनी तरी तो पक्षी बघितला किंवा त्याचा आवाज ऐकला असला पाहिजे.

दरवर्षी पक्ष्यांची नोंद करण्यासाठी नोंदवही वापरली जाते. यंदा मात्र यासाठी वेगळे अॅप्लिकेशन देखील तयार करण्यात आले आहे. या अॅपवर सर्व माहितीची नोंद करण्यात येते. अॅपमुळे ही माहिती ऑनलाइन ट्रान्स्फर करता येऊ शकते. त्यामुळे या माहितीचा संग्रह करणं सोपं जातं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या