Advertisement

हवामान खात्याकडून मुंबईत ऑरेंज अलर्ट

पुढील २ दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून, भारतीय हवामान खात्यानं मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

हवामान खात्याकडून मुंबईत ऑरेंज अलर्ट
SHARES

मुंबईत सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र, असं असलं तरी पुढील २ दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून, भारतीय हवामान खात्यानं मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईत ३ आणि ४ जुलै रोजी मुसळधार पाऊस होईल असाही अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान मुंबईत बुधवारी सांताक्रूझ इथं ०.१ मिमी आणि कुलाबा इथं ०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्याशिवाय उत्तर भारतातीलही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असंही या अलर्टमध्ये सांगितले जाते.

मुंबई ४ जुलैच्या सुमारास शहरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटच्या म्हणण्यानुसार दक्षिण गुजरात आणि आसपासच्या भागात चक्रीवादळ फिरत आहे. हे चक्रीवादळ जोर धरण्याची शक्यता असल्यानं महाराष्ट्रात ३ जुलै किंवा ४ जुलैपर्यंत मान्सून सक्रिय होईल. चक्रीवादळामुळं ६ किंवा ७ जुलैपर्यंत हीच परिस्थिती राहू शकेल.हेही वाचा -

समुद्रात ८ दिवस मोठी भरती, मुंबईकरांना संतर्कतेचा इशारा

Covid-19 Test: महाराष्ट्रात १० लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पारRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा