Advertisement

ग्रीनपीसचे 'रेनबो वॉरियर' मुंबईत दाखल!

आपला देश हा हवामान बदलास वेगाने बळी पडतो आहे. एक अब्जपेक्षा जास्त भारतीयांना सामना करावा लागत असलेल्या या महत्त्वपूर्ण समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी ‘रेनबो वॉरियर’ भारतात आले आहे.

ग्रीनपीसचे 'रेनबो वॉरियर' मुंबईत दाखल!
SHARES

पर्यावरणासाठी काम करणाऱ्या 'ग्रीन पीस' या संस्थेचा संदेश देणारं ‘द रेनबो वॉरियर' नावाचं जगप्रसिद्ध जहाज मुंबईत दाखल झालं आहे. आशा, धैर्य आणि पर्यावरणीय स्थितीस्थापकत्वाचं प्रतीक असलेलं हे जहाज २६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत मुंबईच्या भेटीला आलं आहे. 'द रेनबो वॉरियर' 22 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2017 पर्यंत भारताच्या दौऱ्यावर असून या दरम्यान ते गोवा, मुंबई आणि कोची येथे भेट देणार आहे.


का आले भारताच्या दौऱ्यावर?

आपला देश हा हवामान बदलास वेगाने बळी पडतो आहे. एक अब्जपेक्षा जास्त भारतीयांना सामना करावा लागत असलेल्या या महत्त्वपूर्ण समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी ‘रेनबो वॉरियर (इंद्रधनुषी योद्धा)’ भारतात आले आहे. वारंवार येणारे पूर, दुष्काळ आणि बदलते हंगाम हे सर्व अनियमित हवामान नमुन्यांचा एक भाग आहेत. ‘द रेनबो वॉरियर’ भारताकडून लोकशक्ती, आशा आणि परिवर्तनाचा संदेश घेऊन तो जगापर्यंत पोहोचविण्यासाठी भारत दौऱ्यावर आले आहे.



'द रेनबो वॉरियर'चा उद्देश

‘रेनबो वॉरियर पर्यावरणीय दृष्टिकोन आणि टिकाऊ शेती, नूतनीकरण करता येणारी ऊर्जा, बेकायदा मासेमारीचा पर्दाफाश, हवामान बदल कमी करणे आणि जगाच्या विविध भागांमध्ये प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी सक्रियपणे प्रचार करीत आहे.

'द रेनबो वॉरियर' या गोष्टीची कबुली देते आहे, की जागतिक स्तरावर हवामान बदलासाठी लढा देण्यामध्ये भारताची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. शाश्वत भविष्यासाठी त्याच्या लोककेंद्रित मोहिमांचा सातत्याने पाठपुरावा करून, भारतातील परिवर्तनशील लोक आणि समूहांसह स्वत:ला जोडून घेण्यात प्रयत्नशील राहील.

राहुल प्रसाद, प्रवक्ते, ग्रीनपीस इंडिया



कसे पडले ‘द रेनबो वॉरियर नाव?

‘द रेनबो वॉरियर' (इंद्रधनुषी योद्धा) हे नाव एका आख्यायिकेवरून पडले असून त्यानुसार जेव्हा जगात अराजक माजेल आणि विध्वंस घडेल, तेव्हा लोक ‘रेनबो वॉरियर' (इंद्रधनुषी योद्धा) सारखे पुढे येतील आणि न्याय, शांती आणि स्वातंत्र्याच्या नव्या जगामध्ये मानवतेचा पुरस्कार करतील अशी संकल्पना त्यामागे आहे.

आतापर्यंत त्याच्या नावाचा आणि ध्येयाचा उज्ज्वल वारसा वाहणारी एकूण तीन जहाजे अस्तित्वात आलेली आहेत. १९७७ पासून 'ग्रीनपीस'चा संदेश देणारे ‘द रेनबो वॉरियर' जहाज हे १० जुलैला फ्रेंच गुप्तचर विभागातील दोन एजंटांनी बुडवले. त्यानंतर 1989 मध्ये 'ग्रीनपीस'ने दुसरे ‘रेनबो वॉरियर' खरेदी केले. २२ वर्षांच्या सेवेनंतर १६ ऑगस्ट २०११ साली ते निवृत्त झालं. सध्या ते बांगलादेशातील 'फ्रेंडशिप' नावाच्या एनजीओसाठी हॉस्पिटल जहाजाची भूमिका पार पाडतंय. तिसऱ्या आणि सध्याच्या ‘रेनबो वॉरियर'ने 14 ऑक्टोबर 2011 रोजी आपल्या मोहिमेस प्रारंभ केला होता.



हेही वाचा

मुंबईच्या समुद्र किनारी आढळला 40 फुटांचा व्हेल मासा


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा