Advertisement

मुंबईच्या समुद्र किनारी आढळला 40 फुटांचा व्हेल मासा


मुंबईच्या समुद्र किनारी आढळला 40 फुटांचा व्हेल मासा
SHARES

मुंबईच्या समुद्र किनारी एक मृत व्हेल मासा आढळून आला आहे. जहाजाला आदळून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत पाच महिन्यातली ही दुसरी घटना आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण विभागातील कुलाबा परिसरात समुद्र किनारी 40 फूट लांबीचा व्हेल माशाचा मृतदेह दोन तुकड्यात आढळून आला. या माशाचा एक तुकडा 26 फूट लांब होता. तर दुसऱ्या तुकड्याची लांबी 14 फूट होती.


नेव्हीनगरवासियांनी पालिकेला दिली माहिती

व्हेल माशाला मृतावस्थेत पाहिल्यानंतर कुलाबाच्या नेव्हीनगरमधील रहिवाशांनी याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन विभाग घटनास्थळी पोहचले.

वनविभागाने याची तपासणी केल्यानंतर या व्हेल माशाचा मृत्यू दोन ते तीन आठवड्यापूर्वी झाल्याचे निदर्शनास आले. जहाजाला आदळल्यानेच या माशाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. वन विभागाने व्हेल माशाचे नमुने घेतले असून त्या माशाचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध घेत आहे.



हेही वाचा - 

गेले मासे कुणीकडे?

स्थानिकांची मासे विक्रेत्यांविरुद्ध तक्रार


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा