दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गुरुवार अाणि शुक्रवार संपूर्ण राज्यभर ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानुसार गुरूवार सकाळपासूनच वातावरण ढगाळ असल्याचं पाहायला मिळत अाहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या अाठवड्यापासून उकाड्याला सुरुवात झाल्यामुळे तापमान ३५ अंशापर्यंत गेलं होतं. पण या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईतील तापमान गुरुवारी कमाल २९ अंश तर किमान २७ अंश इतकं खाली अालं होतं. शुक्रवारीही वातावरण असंच राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली अाहे.
पाऊस पडण्याची शक्यता
गुरुवारी अाणि शुक्रवारी राज्यभर हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली अाहे. जर पावसानं हजेरी लावली तर अांबा अाणि काजू या झाडांवरचा मोहोर गळून पडण्याची शक्यता अाहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता अाहे.
शेतकऱ्यांनी हे टाळावं
पुढील दोन दिवसांत गारपीट अथवा वादळी वाऱ्याची शक्यता नसली तरी पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली अाहे. शेतकऱ्यांनी अापल्या शेतमालाची काळजी घ्यावी तसंच कापणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेऊ नये. या काळात शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी अाणलेल्या शेतमालाची काळजी घ्यावी. शेतकरी बांधवांनी अापल्या शेतमालाचं नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असं अावाहन करण्यात अालं अाहे.