Advertisement

रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली झाडांचा बळी


रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली झाडांचा बळी
SHARES

माटुंगा येथील इंडियन जिमखाना हा सर्व खेळांसाठी प्रसिद्ध आहे. या जिमखान्याची जागा ही मोठी असल्याने त्याच्या सभोवती झाडे लावण्यात आली होती. परंतु, जिमखान्याच्या आसपासच्या परिसरात इमारतींच्या पुनर्विकासासाठी परिसरातील रस्ता मोठा होणे गरजेचे आहे. हे काम पालिकेने हाती घेतले असल्याने या कामाला गेल्या महिन्याभरापासून सुरुवात झाली आहे. या रस्ता रुंदीकरणामुळे मैदानाच्या भोवताली असणाऱ्या झाडांचा मात्र बळी दिला गेला. 100 हून अधिक वर्ष जुनी असलेली झाडे मुळासकट तोडण्यात आली. या तोडल्या गेलेल्या झाडांच्या बदल्यात नवीन किती झाडे लावली आहेत आणि लावली जातील याबद्दल अजूनही काही स्पष्ट झालेले नाही. 

या संदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या विषयाची अधिक माहिती ही रस्ते विभागाकडून मिळेल असे उत्तर एफ/उत्तर पालिकेचे आयुक्त केशव उबाळे यांनी दिले. जिमखान्याच्या एकाच बाजूचे रस्त्याचे काम अद्याप चालू असून, 15 हून अधिक झाडांची तोडणी करण्यात आल्याची खंत इंडियन जिमखान्याच्या सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली. इमारतींच्या पुनर्विकासासाठी जर रस्ता लांब केला जात आहे, तर त्यासाठी झाडांची पर्यायी सोयसुद्धा पालिकेने करावी असे माटुंग्यातील रहिवासी स्नेहल जांबोटी म्हणाल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा