आता आवाज होणार बंद?

 Mahim Railway Station
आता आवाज होणार बंद?
आता आवाज होणार बंद?
See all

माहीम - मुंबई शहरात अनेक ठिकाणी तरुण मुलं धूम स्टाइलनं बाइक पळवताना दिसतात. अनेकदा त्यामुळे अपघातही होतात. अपघात हा एक भाग झाला, पण माहीम परिसरातील रहिवासी या गाड्यांमधून येणाऱ्या विचित्र आवाजामुळे त्रासले आहेत. माहीम दर्गा परिसरात बाइक चालवणाऱ्यांमुळे होणाऱ्या आवाजाला त्रासून येथील रहिवाशांनी पोलिसांत या प्रकाराची तक्रार नोंदवली आहे.

बऱ्याचदा या बाइक पळवणाऱ्यांकडून बाइकचा सायलेन्सर बदलून चित्र-विचित्र आवाज निघतील, असे सायलेन्सर लावले जातात. या प्रकारांना आळा बसावा, यासाठी रहिवाशांनी ही तक्रार केली आहे. आता असे आवाज काढणाऱ्या बाइक चालवणाऱ्यांवर पोलीस खरोखरच कारवाई करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Loading Comments