Advertisement

लोकसंस्कृतीचा मराठमोळा आविष्कार २८ डिसेंबरला रंगणार!


लोकसंस्कृतीचा मराठमोळा आविष्कार २८ डिसेंबरला रंगणार!
SHARES

२६ वर्षानंतरही मराठी माणसांच्या मनात घर करून असलेला 'मराठी पाऊल पडते पुढे' हा लोकसंस्कृतीचा मराठमोळा आविष्कार त्याच जोशात आणि त्याच वेगात आजही कायम आहे. हा कलाविष्कार येत्या २८ डिसेंबरला आपला ३५००वा विक्रमी प्रयोग सादर करणार आहे. परळच्या दामोदर सभागृहात हा प्रयोग पार पडेल.



लोकनृत्याचीही सांगड

नृत्य दिग्दर्शक उदय साटम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या संस्कृती जतन सोहळ्यानं गेल्या २६ वर्षांत महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात जाऊन आपला मराठी झेंडा फडकावला आहे. ९० च्या दशकात मराठी रंगभूमीवर मराठी नाटकांबरोबर मराठी वाद्यवृंद हा एकमेव प्रकार सुरू असताना साटम यांनी आपल्या वाद्यवृंदात परंपरा जपणाऱ्या लोकनृत्याचीही सांगड घातली.



अशी आली समोर संकल्पना

गेल्या अडीच दशकात प्रयोगांचे शतकामागून शतक ठोकणाऱ्या 'मराठी पाऊल पडते पुढे'ने मराठी माणसांची आवड-निवड लक्षात ठेवत काळानुसार आपल्या कार्यक्रमात बदल करत आपलं नातं आणखी घट्ट केलं. मराठी संस्कृतीचा वारसा भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी 'मराठी पाऊल पडते पुढे'ची संकल्पना समोर आली. नव्या पीढीला आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी आणि त्याबद्दल गोडी निर्माण व्हावी म्हणून ३५०० व्या प्रयोगानंतरही हा संगीतमय सांस्कृतिक सोहळा असाच सुरू ठेवला जाणार आहे अशी ग्वाही साटम यांनी दिली.


आतापर्यंत अनेक अडचणी आल्या. कधी त्या अडचणी आर्थिक होत्या, तर कधी आयोजनाच्या, पण आम्ही कधीच डळमळलो नाही. ना कधी हार मानली. येईल त्या आव्हानांना धैर्यानं तोंड दिलं. त्यामुळेच मराठीचे प्रयोग सुरू राहू शकले आणि असेच नॉनस्टाप पुढेही सुरू राहतील.

उदय साटम, नृत्य दिग्दर्शक


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा