मुंब्रा ते भेंडीबाजार मुस्लिम बांधवांची पदयात्रा

 Mumbra
मुंब्रा ते भेंडीबाजार मुस्लिम बांधवांची पदयात्रा
मुंब्रा ते भेंडीबाजार मुस्लिम बांधवांची पदयात्रा
मुंब्रा ते भेंडीबाजार मुस्लिम बांधवांची पदयात्रा
मुंब्रा ते भेंडीबाजार मुस्लिम बांधवांची पदयात्रा
See all

मुंब्रा - मुस्लिम धर्मगुरू इमाम हुसेन चौदाशे वर्षांंपूर्वी इराकच्या करबाला येथे शहीद झाले होते. त्या निमित्त इराक नजब ते करबलापर्यंत मुस्लिम समाजातले लोक पदयात्रा काढतात. पण जे तिकडे जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी मुंब्रा ते भेंडीबाजार अशी पदयात्रा काढण्यात आली. 18 नोव्हेंबरला मुंब्र्याहून शेकडो मुस्लिम सकाळी 8 वाजता निघाले. या पदायात्रेत लहान मुलं, महिला, युवक अशा सर्वांचाच समावेश होता. दोन वर्षांपासून ही पदयात्रा काढली जाते आहे. विक्रोळी, घाटकोपर, मानखुर्द, गोवंडी येथूनही मुस्लिम या पदयात्रेत सहभागी होतात आणि पदयात्रा भेंडीबाजारापर्यंत येते.

Loading Comments