Advertisement

... आणि बिग बॉसमध्ये फुटलं हास्याचं कारंजं

वादविवाद, भांडणं, हाणामारी, भावूक होणं या बिग बॉसच्या घरातील रोजच्याच घटना आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण एखाद्या दिवशी जेव्हा हास्याचं कारंज फुटतं तेव्हा सर्वांनाच त्याबद्दल कुतूहल वाटतं.

... आणि बिग बॉसमध्ये फुटलं हास्याचं कारंजं
SHARES

वादविवाद, भांडणं, हाणामारी, भावूक होणं या बिग बॉसच्या घरातील रोजच्याच घटना आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण एखाद्या दिवशी जेव्हा हास्याचं कारंज फुटतं तेव्हा सर्वांनाच त्याबद्दल कुतूहल वाटतं.

बिग बॉस मराठीमध्ये अभिजीत बिचुकले परतल्यानं घरामध्ये खेळीमेळीचं वातावरण तयार झालं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं काहीतरी म्हणणं असतं, प्रत्येक गोष्टीकडं त्याचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच असतो. बिचुकले स्वत:ला रिअॅलिटी किंग समजतो. याचं नेहमीच म्हणणं असतं की, वन अँड ओन्ली अभिजीत बिचुकले. घराबाहेर वादग्रस्त असणाऱ्या बिचुकलेची घरामध्ये सुरू असलेली धम्माल मस्ती बघण्याजोगी असते. आता घरामध्ये सुरू असलेल्या कार्यात देखील बिचुकलेनं गंमत आणली आहे. या कार्यानुसार बिग बॉस कधीही कोणत्याही सदस्याला स्टॅच्यू आणि रिलीझची सूचना देऊ शकतात. यामुळंच बिचुकलेला जरा अवघड परिस्थितीत अडकलेला पाहून घरातील सदस्यांना हसू आवरेनासं झालं.

नेहा, शिवानी, बिचुकले, रूपाली आणि आरोह बसले असताना बिचुकले बिग बॉसना विनंती करताना दिसणार आहेत. बिग बॉस कधीही स्टॅच्यू सांगू शकतात. त्यामुळं बिचुकले त्यांना सांगत आहेत की, मी बाथरूमला जाणार आहे कृपया मला जाऊ द्या. त्यावर नेहाचं म्हणणं आहे की, त्याबद्द्ल प्रस्तावना न देता जाऊन या, पण बिग बॉसनी मात्र बिचुकलेला टी शर्ट बदलताना स्टॅच्यू केलं.  हे बघून घरामध्ये एकच कल्ला झाला आणि सगळ्यांना हसू फुटलं. घरातील सदस्यांचं म्हणणं होतं की, तुम्ही दरवेळी हेच करता म्हणून तुम्हाला स्टॅच्यू केलं. बाथरूममध्ये जाऊन बदलायचे ना कपडे. हे बोलतानाच सदस्यांना हसू अनावर झालं.

एकीकडं बिग बॉसमध्ये हशा पिकलेला असताना दुसरीकडं काहीसं भावूक वातावरणही पहायला मिळणार आहे. ६६ दिवस आपल्या माणसांपासून दूर रहाणं अवघडच. त्यांच्याशी न बोलता, न भेटता, कुठल्याही प्रकारच संपर्क न ठेवता रहाण्याचा आपण विचार देखील करू शकत नाही, पण हे सदस्य मोठ्या धीरानं हे करत आहेत. जेव्हा इतक्या दिवसांनी आपला माणूस अनपेक्षितरीत्या आपल्याला भेटतो, तेव्हाचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण होतं. असंच काहीसं घरातील सदस्यांबाबत होणार आहे. 

बिग बॉस सदस्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींना भेटण्याची संधी देणार आहेत किंवा त्यांची इच्छा पूर्ण करणार आहेत असं म्हणायला हरकत नाही. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नेहाला नचिकेत भेटायला येणार आहे. त्याला इतक्या दिवसांनंतर समोर बघून नेहाला अश्रू अनावर झाले. 'सुखा सुखी घेता घास... ठसका लागे, अडके श्वास... जो पाणी होऊनी येई त्यास सखा जिवाचा मानावा...' या ओळी म्हणत नचिकेतनं घरामध्ये एंट्री केली आणि सगळेच शांत झाले. नचिकेतनं घरामध्ये आल्यावर नेहाला कोणते सल्ले दिले?  ते पुढं पहायला मिळेल.हेही वाचा  -

पुरू बेर्डेंचा कुंचला म्हणतोय, 'बोल राजा बोल'

शबाना आझमी खाणार 'शीर कोर्मा'संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा