दादर भगिनी समाजाचे 84 वे वार्षिक स्नेहसंमेलन

 Dadar
दादर भगिनी समाजाचे 84 वे वार्षिक स्नेहसंमेलन

दादर - दादर भगिनी समाजाचे 84 वे वार्षिक स्नेहसंमेलन हिंदू कॉलनीतल्या दादर भगिनी समाज हॉलमध्ये गुरुवारी पार पडले. यावेळी अक्षर सुलेखनकार अच्युत गोडबोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी दादर भगिनी समाजाच्या अध्यक्षा सुचित्रा गोडबोले यांच्या हस्ते अच्युत गोडबोले यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी अच्युत गोडबोले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. गोडबोले यांनी अर्थशास्त्र, सामाजिक, संगणक अशा अनेक विषयांवर मराठीतील आतापर्यंत 29 पुस्तके त्यांनी लिहली. पुस्तके किती विकली गेली आणि किती नाही याचा कधीच फरक पडला नाही. पण पुस्तक वाचल्यावर वाचकांचा मिळणारा प्रतिसाद हा जास्त महत्त्वाचा वाटत असल्याचं गोडबोले यांनी म्हटलं.

दादर भगिनी समाजातर्फे महिन्यभरपूर्वी घेण्यात आलेल्या तात्काळ कविता वाचन आणि काव्यवाचन स्पर्धेच्या विजेत्यांचा बक्षीस समारंभ या पहिल्या सत्रात पार पडला. तर मार्च महिन्याच्या 9, 16, 23, 24, 30 या तारखेला विविध मनोरंजक कार्यक्रम होणार आहेत.

Loading Comments