Advertisement

'अग्गंबाई सासूबाई' म्हणत तेजश्रीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

भल्याभल्यांना मोठ्या पडद्याचं आकर्षण असलं तरी छोट्या पडद्यावर काम केलेले कलाकार कधी ना कधी मालिकांकडे वळतातच. टीव्हीकडून चित्रपटांमध्ये गेलेली तेजश्री प्रधानही छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

'अग्गंबाई सासूबाई' म्हणत तेजश्रीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन
SHARES

भल्याभल्यांना मोठ्या पडद्याचं आकर्षण असलं तरी छोट्या पडद्यावर काम केलेले कलाकार कधी ना कधी मालिकांकडे वळतातच. टीव्हीकडून चित्रपटांमध्ये गेलेली तेजश्री प्रधानही छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

तीन वर्षांचा ब्रेक

तेजश्री प्रधानचं नाव घेताच 'होणार सून मी या घरची' या मालिकेतील जान्हवीचा चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो. तेजश्रीनं जान्हवीची व्यक्तिरेखा इतकी सजीव केली होती की तिच्या मुखातील 'काहीही हां श्री' हा डायलॅाग गल्लीबोळातही लोकप्रिय झाला होता. या मालिकेनंतर मोठ्या पडद्याकडं वळत 'झेंडा', 'शर्यत', 'लग्न पहावं करून', 'डॅा. प्रकाश बाबा आमटे', 'ती सध्या काय करते', 'असेही एकदा व्हावे' या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात यश मिळवलं. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'जजमेंट' या चित्रपटातील तेजश्रीनं साकारलेल्या व्यक्तिरेखेचंही खूप कौतुक झालं. आता जवळजवळ तीन वर्षांच्या ब्रेकनंतर तेजश्री पुन्हा मालिकांकडे वळली आहे.


दिग्गज कलाकारांचा मेळ

झी मराठी वाहिनीवर सुरू होणाऱ्या 'अग्गंबाई सासूबाई' या आगामी मालिकेत तेजश्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तेजश्रीसोबत या मालिकेत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिकेत आहेत. दिग्गज कलाकारांचा मेळ असलेली ही मालिका नक्कीच रंजक असेल यात शंकाच नाही. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि या प्रोमोमुळे मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. तेजश्री प्रधानला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहणं तिच्या चाहत्यांसाठी औस्त्युक्याचं ठरणार आहे. प्रेक्षकांचा निरोप घेणाऱ्या 'तुला पाहते रे' या मालिकेच्या जागी २२ जुलैपासून ही मालिका सुरू होणार आहे.


सासूची करवली

या मालिकेचा उत्कंठावर्धक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये एका लग्नसोहळ्याचा सीन आहे. सर्वांची घाई गडबड सुरू असते. इतक्यात 'मुलीच्या मामांनी मुलीला घेऊन या', असा आवाज भटजी देतात. तेव्हा 'मुलीचे मामा तर केव्हाच गेले वर... मी आणलं तर चालेल?' असा प्रश्न विचारत तेजश्रीची एंट्री होते. नंतर सासूबाईंना आवाज देत ती चक्क आपल्या सासूला नवरी बनवून लग्न मंडपात आणते. या लग्नात ती जणू सासूची करवलीच बनल्याचं दिसतं. त्यामुळं प्रोमो पाहिल्यानंतर मालिकेत नेमकं काय पहायला मिळणार? तेजश्रीच्या सासऱ्यांच्या भूमिकेत कोण दिसणार? आणि विशेष म्हणजे तेजश्रीची जोडी कोणासोबत जमली आहे? हे प्रश्न उपस्थित होतात. ज्यांचं उत्तर लवकरच मिळेल.हेही वाचा -

प्रभास बनला श्रद्धाचा ‘सायको सैंया’

'दूसरा'साठी समिधा गुरु शिकली राजस्थानी भाषा
संबंधित विषय
Advertisement