Advertisement

'दूसरा'साठी समिधा गुरु शिकली राजस्थानी भाषा

आजवर नाटक, मालिका आणि मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार अभिनय करणाऱ्या समिधा गुरूची पावलंही हिंदी चित्रपटसृष्टीच्या दिशेनं वळली आहेत. 'दूसरा' या आगामी हिंदी चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

'दूसरा'साठी समिधा गुरु शिकली राजस्थानी भाषा
SHARES

आजवर नाटक, मालिका आणि मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार अभिनय करणाऱ्या समिधा गुरूची पावलंही हिंदी चित्रपटसृष्टीच्या दिशेनं वळली आहेत. 'दूसरा' या आगामी हिंदी चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.


यशस्वी ठसा

समिधा गुरू हे नाव मालिकांच्या चाहत्यांनाही नवं नाही की, रंगभूमीवरील रसिकांनाही अनोळखी नाही. चित्रपटांपेक्षा नाटक आणि मालिकांमध्येच अधिक रमलेल्या समिधानं हिंदी चित्रपटात हजेरी लावली आहे. आजवर कधीही माध्यमांच्या बंधनात न अडकलेल्या समिधानं सेटवरील सहज वावर, उल्लेखनीय संवादफेक, वास्तवाशी संलग्न करणाऱ्या जातिवंत अभिनयाच्या जोरावर मराठी मनोरंजनक्षेत्रात आपला यशस्वी ठसा उमटवलेला आहे. याच बळावर ती हिंदी चित्रपटांच्या चाहत्यांनाही मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाली आहे. 


क्रिकेटप्रेमी मुलीची कथा

मराठमोळा दिग्दर्शन अभिनय देवच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'दूसरा' हा हिंदी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असल्याची बातमी आम्ही काही दिवसांपूर्वीच दिली होती. अभिनयच्या या चित्रपटातच हिंदी प्रेक्षकांना समिधाचा अभिनयही पहायला मिळणार आहे. सतत नावीन्याच्या शोधात असणाऱ्या दिग्दर्शक अभिनय देवच्या 'दूसरा' या आगामी हिंदी चित्रपटामध्ये एका क्रिकेटप्रेमी मुलीची कथा पहायला मिळणार आहे. या मुलीच्या आवडी-निवडीवर हा चित्रपट आधाराला आहे. या मुलीच्या आईची भूमिका समिधानं साकारली असून, या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेत ती राजस्थानी भाषा आणि लहेजा शिकली आहे. 


राजस्थानी स्त्री साकारली 

समिधासोबत या चित्रपटात प्लबीता बोरठाकूर, अंकुर विकल यांच्या मुख्य भूमिका आहेत. समिधानं 'दूसरा' चित्रपटात एका राजस्थानी पारंपरिक-रूढीवादी कुटुंबाचं प्रतिनिधित्व करणारी स्त्री साकारली आहे. 'कापूस कोंड्याची गोष्ट' या वास्तववादी चित्रपटासाठी राज्य पुरस्कारासह बऱ्याच नामांकित पुरस्कारांवर नाव कोरणाऱ्या समिधानं 'कायद्याचं बोला', 'लाल इश्क' हे चित्रपट, 'गेट वेल सून', 'तळ्यात-मळ्यात' ही नाटकं, तर 'अवघाची सांसार', 'कमला', 'क्राईम पेट्रोल', 'जिवलगा' या मालिकांमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. 'दूसरा'साठी निवड होणं हे एकामागोमाग मिळत जाणाऱ्या संधीचं नेहमीच केलेलं स्वागत आणि आपल्यापरीनं प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याचा केलेला प्रयत्न याचं फलित असल्याचं समिधा मानते.हेही वाचा -

सूत्रसंचालिका बनून 'आऊट' करणार पर्ण पेठे

'टकाटक'ची तीन दिवसांत तीन कोटींहून अधिक कमाईसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा