Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

प्रभास बनला श्रद्धाचा ‘सायको सैंया’

‘बाहुबली’ फेम प्रभास मागील बऱ्याच दिवसांपासून ‘साहो’ या चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. या चित्रपटात तो श्रद्धा कपूरचा ‘सायको सैंया’ बनल्याचं पहायला मिळणार आहे.

प्रभास बनला श्रद्धाचा ‘सायको सैंया’
SHARES

‘बाहुबली’ फेम प्रभास मागील बऱ्याच दिवसांपासून ‘साहो’ या चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. या चित्रपटात तो श्रद्धा कपूरचा ‘सायको सैंया’ बनल्याचं पहायला मिळणार आहे.


धडाकेबाज अभिनय 

‘बाहुबली २’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच प्रभास कोणत्या चित्रपटात दिसणार याचे त्याच्या चाहत्यांना वेध लागले होते. ‘साहो’ असं या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर सर्वांच्याच मनात या चित्रपटाबाबत कुतूहल निर्माण झालं. आता ‘साहो’च्या प्रदर्शनाची तारीख जवळ आल्यानं आता या चित्रपटाचं प्रमोशनही सुरू झालं आहे. याचं पहिलं पाऊल म्हणजे ‘साहो’मधील गाणं रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा प्रभासचा धडाकेबाज अभिनय पहायला मिळेल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे.


१५ आगस्ट रोजी प्रदर्शित 

या चित्रपटात प्रभासच्या जोडीला श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळं या दोघांच्या केमिस्ट्रीबाबतही उत्सुकता आहेच. या केमिस्ट्रीची पहिली झलक ‘साहो’मधील ‘सायको सैंया…’ या गाण्यात पहायला मिळणार आहे. १५ आगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘साहो’मधील ‘सायको सैंया…’ हे गाणं लवकरच रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं प्रभास आणि श्रद्धा प्रथमच एकत्र आले आहेत. त्यामुळं दोन तुल्यबळ कलाकारांच्या केमिस्ट्रीसोबतच त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्याचीही संधीही या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना मिळणार आहे.


तीन भाषांमध्ये शूट

या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजीत यांनी केलं असून, जॅकी श्राफ, नील नितीन मुकेश, विरेंद्र किशोर, मुरली शर्मा, अरुण विजय, प्रकाश बेलवडी, एव्हलीन शर्मा, महेश मांजरेकर, टीनू आनंद अशी नामवंत कलाकारांची भली मोठी फौज या चित्रपटात आहे. हा चित्रपट एकाच वेळी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत शूट करण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि तेलुगू संवादलेखन सुजीत यांनीच केलं आहे. के.जी.आर. अशोक यांनी तमिळ, तर अब्बास दलाल आणि हुसैन दलाल यांनी हिंदी संवादलेखन केलं आहे.हेही वाचा -

'दूसरा'साठी समिधा गुरु शिकली राजस्थानी भाषा

माहीची 'ठाकूरगंज फॅमिली' पाहिली का?
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा