परळमध्ये 'शाळा प्रवेश दिन' साजरा

 BMC office building
परळमध्ये 'शाळा प्रवेश दिन' साजरा

भोईवाडा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'शाळा प्रवेश दिन' म्हणजेच 12 नोव्हेंबर महाराष्ट्र शासनाने 'प्रेरणा दिन' म्हणून साजरा करावा असा प्रस्ताव आहे. तर परळ-भोईवाडा येथील विश्वशांती सामाजिक संस्थेनं 11 नोव्हेंबरला 'शाळा प्रवेश प्रेरणा दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाचं उद् घाटन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते झालं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आज आपण प्रगती करू शकलो. येत्या काळात 'शाळा प्रवेश दिन' आपण 'प्रेरणा दिन' म्हणून साजरा करणार असून, हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रेरणास्रोत निर्माण करणारा असेल, असा विश्वास राज्याचे सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी या वेळ व्यक्त केला. या वेळी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा चित्रा वाघ, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे, बौद्धजन पंचायत समिती गटप्रतिनिधी नागसेन कांबळे, चंद्रशेखर कांबळे, भगवान साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments