Advertisement

जमनालाल बजाज पुरस्कार कुणाकुणाला जाहीर? वाचा


जमनालाल बजाज पुरस्कार कुणाकुणाला जाहीर? वाचा
SHARES

सामाजिक कार्य आणि मानवतावादसाठी लढणाऱ्या राजस्थानच्या शशी त्यागी, प्रवीण नायर आणि जियाद मिदुख यांना जमनालाल बजाज पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रशस्तीपत्र, पारितोषिक आणि 10 लाख रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. हा पुरस्कार सोहळा मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थमंत्री अरुण जेटली होते. महात्मा गांधी यांनी मांडलेले विचारांना ज्या व्यक्ती आज पुढे नेत आहेत. अशा व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला.


पुरस्कृत व्यक्तिमत्वाचे थोडक्यात कार्य


  • शशी त्यागी
    राजस्थानच्या ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचा विडाच शशी त्यागी यांनी उचलला आणि संपूर्ण आयुष्य या कार्यात झोकून काम करत आहेत. ग्रामीण भागाचा विकास व्हावा याकरता स्त्री शिक्षण, पशुपालन, आरोग्य, जलविकास, शेती अशा गोष्टी सुधाराव्यात, त्यात प्रगती व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले.


  • जन स्वास्थ्य सहयोग

मुख्यतः हा ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुधारावे यासाठी ही संस्था 1996 पासून काम करत आहे. त्यासाठी डॉक्टराना, प्रशिक्षण देण्याचे काम केले जात आहे.


  • प्रवीण नायर

प्रवीण नायर या सलाम बालक ट्रस्टच्या संस्थापक आहेत. रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी ही संस्था काम करते. रस्ता, सिग्नलवर काम करणाऱ्या मुलांना शिक्षण देणे, आरोग्य चांगले राहावे, दोन वेळा पोटभर जेवण मिळावे यासाठी ही संस्था 1988 पासून लढत आहे. या मुलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे यादृष्टीने त्यांना शिक्षण दिले जाते.


  • जियाद मिदुख

जियाद मिदुख गरीब शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून हस्त शिल्प शिकवायला सुरुवात केली. ते सध्या देश-विदेशात जाऊन महात्मा गांधींनी शिकवलेली मूलतत्त्वे विदेशात पसरवत आहेत.

संबंधित विषय
Advertisement