वरळीत पेटली निषेधाची 51 फुटी होळी!


SHARES

वरळी - पोलिसांवर हल्ला करणाऱ्या नराधमांचा निषेध करणारी होळी यंदा बीडीडी चाळ क्रमांक 76-77 च्या विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने जाळण्यात आली. तब्बल 51 फुटांची ही होळी हुतात्मा झालेले ट्रॅफिक हवालदार विलास शिंदे आणि पोलीस शिपाई राहुल कांबळे यांच्या कुटुंबियांच्या हस्ते जाळण्यात आली. पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी 51 फुटांचा हा भस्मासूर तयार करण्यात आला होता. बीडीडी चाळ क्रमांक 76-77 च्या विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक संदेश देणारी होळी साकारण्यात येते. यंदा पोलिसांवर हल्ला करणाऱ्या नराधमांचा निषेध करणारी होळी या ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांच्या मुलांनी साकारली होती

संबंधित विषय